अजित पवारांच्या अपघातावर पत्रकार परिषद घेणाऱ्या रोहित पवारांवर गिरीश महाजन यांची जोरदार टीका (फोटो - सोशल मीडिया)
मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. DGCA यांच्या अहवाल आणि VSR कंपनीच्या विमानसेवेवर जोरदार टीका केली. या कंपनी वाचवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. मात्र गिरीश महाजानांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. महाजन म्हणाले की, “गलिच्छ राजकारण कोणाकडून सुरु आहे हे सगळ्यांना दिसत आहे. मी पुन्हा एकदा सांगतो आहे की अजित पवारांच्या अपघाती निधनाचे कोणीही राजकारण करु नये,’ असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : महाराष्ट्राचे ५० बिबटे होणार अंबानींचे पाहुणे! वनताराला पाठवून मानव-प्राणी संघर्षाला आळा घालण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न
पुढे ते म्हणाले की, “कुणी म्हणतंय बॉम्ब ठेवला तर कोणी म्हणतंय की सुसाईट बॉम्बर होता. अनेक वेगवेगळे तर्क लावले जात आहे. कुणीही अकलेचे तारे तोडत आहेत. या प्रकरणाची चौकशी व्हावी ही सगळ्यांची भावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील तेच वाटत आहे. त्यामुळे राजकारण शेकण्यासाठी कोणीही व्हल्गर विधानं करु नये,” अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
हे देखील वाचा : गेम होणार अन् बिहारमध्ये ‘चाणक्य’ भाकरी फिरवणार? नितीश कुमार राज्यसभेवर जाताच…; BJP चा ‘हा’ नेता…
अजित पवारांचे पुत्र जय पवार हे देखील आता पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये ते काय भूमिका मांडणार याबाबत चर्चा सुरु आहे. जय पवारांच्या पत्रकार परिषदेवर गिरीश महाजन म्हणाले की, “या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने तसेच मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. केंद्र शासनाकडूनही गंभीर दखल या अपघाताची घेण्यात आली आहे. कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावं. अपील करायचं असेल तर ते करावं. कुणाला अर्ज करायचा असेल तर करू शकतात. काही मागणी करायची असेल तर करू शकतात. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये १०० टक्के पारदर्शकता आहे. संभ्रम असण्याची काडीमात्र शक्यता नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.






