कल्याणमध्ये राकेश मुथा यांचे शेवटच्या दिवशी शक्तीप्रदर्शन; रॅलीदरम्यान झालेल्या कचऱ्याची कार्यकर्त्यांनी केली सफाई
विधानसभा निवडणूक प्रचारसभा अंतिम टप्प्य्यात आला असून आज प्रचाराचा शेवटाचा दिवस आहे. या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांच पक्षांच्या प्रचारसभांना वेग आला होता. महायुती आणि महाविकास आघाडी तसेच इतर पक्षांकडून देखील भव्य रोड शो आणि शक्तीप्रदर्शनं करण्यात आली. आज या प्रतारसभेची सांगता होत आहे. यादरम्यान याच पार्श्वभूमीवर कल्याण विधानसभा मतदारसंघात सध्या जिजाऊ विकास पार्टीने केलेल्या कामामुळे सध्या राकेश मुथा चर्चेत आहेत.
प्रचारसभेत सर्व पक्षीय उमेदवारांनी प्रचारात जोर लावला होता. जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा यांनी भव्य प्रचार रॅली काढली होती. या प्रचार रॅलीदरम्यान काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. रस्त्यावर त्यामुळे कचरा झाला होता. या कचऱ्यामुळे स्थानिकांना त्रास होऊ नये तसंच परिसराची स्वच्छता करणं ही स्वत:ची जबाबदारी आहे, हे लक्षात घेत जिजाऊ समाज पार्टीच्या कार्यकर्यांनी परिसरातील कचरा साफ केला. या कार्यामुळे जिजाऊ समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांच नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. त्यामुळे जिजाऊ विकास पार्टी आणि पर्यायाने राकेश मुथा यांच्या विषयी स्थानिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
निवडणुकीच्या बातम्यांसाठी इथे क्लीक करा
कल्याण पश्चिम मतदार संघात सर्व पक्षीय उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. महायुती असो महाविकास आघाडी यांच्या उमेदवारांनी प्रचारात संपूर्ण ताकद लावली आहे. कल्याण पश्चिम मतदार संघात जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा यांनी देखील प्रचारात आघाडी घेतली. रविवारी त्यांची प्रचार रॅली होती. या रॅली दरम्यान हाजारो असंख्य कार्यकर्ते सहभागी होते. मोहने ते कल्याण दरम्यान ही प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान सहजानंद चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मोठ्या प्रमाणात फटाके वाजविण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर कचरा झाला होता. राकेश मुथा यांनी रॅली संपल्यावर कार्यर्त्यांना सूचना केली की, ज्या ठिकाणी आपल्या रॅलीमुळे कचरा झाला असेल तो त्वरीत स्वच्छ करावा. कार्यकर्त्यांनी हा कचरा स्वच्छ करत रस्ता साफ केला.
हेही वाचा- Ratnagiri: “तुम्हाला गरिबांची काय जाण असणार”, मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
या प्रामाणिकपणाचे उमेदवार आणि त्याच्या कार्यकर्यांचे कौतूक केले आहे.काही दिवसांपूर्वीच राकेश मुथा यांच्या होर्डिंग आणि बॅनरची काही अज्ञातांकडून विटंबना करण्यात आली. त्यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं होतं. दरम्यान यासगळ्य़ा प्रकारानंतर निवडणूक आयोगाने बेकायदा सर्वच पक्षांच्या होर्डिंग आणि बॅनरवर कारवाई करण्याचे आदेश कल्याण-डोंबिवली मनपाला दिले. त्यानंतर कल्याण डोंबिवली मनपाकडून या कारवाईची अंबलबजावणी करण्यात आली आहे.