इंडोनेशियात भीषण दुर्घटना! रियटारमेंट होमला लागली आग; १० हून अधिक वृद्धांचा होरपळून मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इंडोनेशियात भीषण बस अपघात! बॅरियरला धडकून गाडी पलटली अन्…; १० हून अधिक लोकांचा मृत्यू
या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून केवळ एकाच व्यक्तीचा मृतहेद जळण्यापासून वाचला आहे. तर या घटनेत जखमी झालेल्यांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. सध्या मृतांमध्ये कोणाचा समावेश होता याचा शोध घेतला जात आहे. यासाठी फॉरेन्सिक तपासणी सुरु आहे.
रिटारमेंट होमच्या शेजाच्या रहिवाशांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली होती. यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तिथे तातडीने पोहेचल्या. मात्र आग विझवण्यासाठी जवळपास दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
इंडोनेशियाच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या आग लागण्यामागचे कारण अस्पष्ट असून याची चौकशी केली जात आहे. संपूर्ण परिसरात बंदोबस्त करण्यात आला आहे. या घटनेने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. प्रत्यक्षदर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आगीच्या ज्वाळा दिसल्या, यासोबतच लोकांच्या किंचाळ्यांचे आवाज आहे. शेजाऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न देखील केले. पण आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाला देखील विझवण्यात अडथला येत होता.
दरम्यान या घटनेच्या एक आठवडा आधी इंडोनेशियात भीषण बस अपघात घडला होता. एक बस भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस सुरक्षा बॅरियरला जाऊन धडकली होती. यामध्ये किमान १६ जणांचा मृत्यू झाला होता. तर १९ जण गंभीर जखमी झाले होते. अपघात इतका भयानक होता की प्रत्यक्षदर्शनींचा थरकाप उडाला होता. बस पूर्णपमे हवेत उलटून रस्त्यावर जोरात आदळली होती.
Ans: इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी प्रांतात मनाडो एका रिटारमेंटला होमला रविवारी (२८ डिसेंबर) आग लागली होती.
Ans: इंडोनेशियातील रिटारयमेंट होमला लागलेल्या आगीत १६ वृद्धांचा मृत्यू झाला आहे.






