लोकलच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा सुरु; रविंद्र चव्हाण यांची माहिती
लोकलची वाढती गर्दी आणि लोकलच्या प्रवासावेळी महिलांचे होणारे हाल याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत चर्चा केली आहे. रेल्वे प्रवाशांच्या समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल, असं रविंद्र चव्हाण यांनी सांगितलं. रामभाऊ म्हाळगी यांचे रेल्वे प्रवाशांशी अनोखे नाते आहे. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसेंची ही परंपरा मी जपण्याचा प्रयत्न करतोय, असं देखील चव्हाण यावेळी म्हणाले.
हेदेखील वाचा- मी पक्षासाठी गुवाहाटीपर्यंत गेले पण तरी…; नाराज महिला नेत्यानी व्यक्त केली खंत
रविंद्र चव्हाण यांनी सांगितलं की, डोंबिवली मतदारसंघ आणि ठाणे जिल्हा हा रामभाऊ म्हाळगी यांचा मतदारसंघ मानला जातो. त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. पॅसेंजर असोशिएशन सारख्या विषयाला रामभाऊ म्हाळगी यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली. कालच निवडणूकीचा फॉर्म भरला. आज सकाळी 7 वाजल्यापासून रेल्वे स्टेशनवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रवाशांना प्रचाराच्या साहित्याचे वाटप करत आहेत. खऱ्या अर्थाने आजपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे. मला विश्वास आहे की विक्रमी मतांनी लोकं मला मतदान करतील आणि निवडून आणतील.
रेल्वेच्या सकाळच्या प्रवासावेळी गाड्या उशीराने धावत आहेत. त्याचं कारण काय आहे, यामुळे प्रवाशांना होणार त्रास याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील याबाबत चर्चा केली आहे. या सर्व अडचणी येणाऱ्या काळात लवकरच दूर केल्या जाणार आहेत. तसेच 15 डब्यांच्या गाड्या, लेडीज स्पेशल लोकल सोडण्याची मागणी देखील केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे, असं देखील चव्हाण यांनी यावेळी सांगितलं आहे.
हेदेखील वाचा- संगमनेरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाने भाजपच्या शहर प्रमुखाच्या श्रीमुखात भडकावली…
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, शहराचे वाढते नागरिकरण लक्षात घेऊन आगामी काळात 15 डब्यांच्या लोकल डोंबिवलीसह कल्याणमधून सोडण्यासाठी मी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना सगळी माहिती दिली असून लवकरच सकारात्मक बदल घडणार आहे. लोकलच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा सुरु आहे. कै. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांची रेल्वे प्रवाशांशी असलेलं अतूट नाते सर्वश्रुत आहे, ते जपण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत असून मला रेल्वे प्रवासातील अडचणी माहिती आहेत.
डोंबिवलीच्या प्रवाशांशी नेहमीच रेल्वे प्रवासात चर्चा होत असते, बुधवारी स्वतः येऊन माझा जाहीरनामा प्रवाशांना दिला, त्यांनी त्यांच्या अपेक्षा मला सांगितल्या आहेत, त्यामुळे मी त्या वरिष्ठ पातळीवर मांडणार आहे. लांबपल्याच्या गाड्या वेळेत येत नाही त्यावर देखील आम्ही चर्चा केली आहे. जास्तीतजास्त समस्या लवकरात लवकर कशा सुटतील यावर लक्ष देणार आहे. लोकलच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा सुरु आहे. महिला स्पेशल लोकल कल्याण, डोंबिवलीमधून सोडण्यासाठी मी विशेष लक्ष घालत आहे, असं आश्वासन देखील चव्हाण यांनी यावेळी दिलं आहे.