Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिर्डीत शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघ दौऱ्यादरम्यान शेकडो शिवसैनिकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणावरून त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: Jun 23, 2026 | 09:51 PM
शिर्डीत शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप

शिर्डीत शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:
  • शिर्डीसह चार ठिकाणी शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा संजय राऊतांचा आरोप
  • या कारवाईमागे फडणवीस सरकार असल्याचा संशय केला व्यक्त
  • विकासासाठी शिंदे गटात गेलो असून मतदारसंघात फिरत राहणार, असे खासदार वाकचौरेंनी केले स्पष्ट
 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या सहा खासदारांमध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही समावेश आहे. पक्षांतरानंतर प्रथमच वाकचौरे शिर्डी मतदारसंघात दाखल झाले असता त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली. मात्र या दौऱ्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. संजय राऊतांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ हॅण्डलवरून पोस्ट करत मोठे आरोप केले आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?

खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे गंभीर आरोप करत म्हटले की, “शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, राहाता पोलिस स्टेशनला शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवणे ही सरकारची झुंडशाही आहे! (डरपोक गद्दार) भाऊसाहेब वाघ चौरे यांनी गद्दारी केल्यानंतर आज प्रथमच शिर्डी येथे आले. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ! त्यांना कोणीही जाब विचारू नये, म्हणून सकाळी १० वाजल्यापासून शेकडो शिवसैनिकांना शिर्डी पोलिस स्टेशन, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन, संगमनेर पोलीस स्टेशन, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन, राहाते पोलीस स्टेशन येथे नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.”

अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड बैठकीनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी घडामोड

फडणवीसांवर थेट सवाल

muख्यमंत्री फडणवीसांवर टीका करता ते पुढे म्हणाले, “फडणवीस गद्दार खासदार ज्या रस्त्याने प्रवास करत आहेत, ते रस्ते पूर्णपणे बंद करून ठेवण्यात आले आहेत. अहिल्यनगर पोलिसांना शिवसैनिकांना अटकेत ठेवण्याचे आदेश स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत का? ही सरकारी दहशत आहे का? उघडपणे फिरण्याची हिम्मत नाही, तर गद्दारी केली कशाला? अहिल्यानगर पोलिसांनी तत्काळ सर्व शिवसैनिकांना सोडावे! एसपी मुंमांका सुदर्शन यांना विशेष विनंती – ही अन्याय्य कारवाई थांबवा.” असे ते यावेळी म्हणाले.

शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, राहाता पोलिस स्टेशनला शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवणे ही सरकारची झुंडशाही आहे!
(डरपोक गद्दार)
भाऊसाहेब वाघ चौरे यांनी गद्दारी केल्यानंतर आज प्रथमच शिर्डी येथे आले . मोठ्या पोलिस बंदोबस्तात !त्यांना कोणीही जाब विचारू नये, म्हणून सकाळी १० वाजल्यापासून शेकडो…
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 23, 2026

“मी माझ्या मतदारसंघात पाय ठेवणारच” – भाऊसाहेब वाकचौरे

दरम्यान, या वादावर प्रतिक्रिया देताना भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपण घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगितले. मतदारसंघातील बहुसंख्य कार्यकर्ते आणि नागरिक आपल्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचा दावा त्यांनी केला.

विकासासाठीच निर्णय घेतल्याचा दावा

वाकचौरे म्हणाले की, आम्ही सहाही खासदार मतदारसंघाच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झालो आहोत. हा मतदारांचा विश्वासघात नसून त्यांच्या विकासासाठी घेतलेला निर्णय आहे. तसेच “माझ्या मतदारसंघात मी पाय ठेवणारच,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

‘बाळासाहेबांचा अवमान केलेलाच नाही’; वादग्रस्त वक्तव्यावर किरण पावसकरांचे स्पष्टीकरण, ठाकरे गटावर पलटवार

पक्षांतरानंतर राजकीय वातावरण तापले

उद्धव ठाकरे गटातून सहा खासदारांनी बाहेर पडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आधीच ढवळून निघाले आहे. अशातच शिर्डीतील कथित नजरकैद प्रकरणामुळे आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली असून या प्रकरणावर सरकार किंवा पोलिस प्रशासनाकडून अधिकृत भूमिका येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Sanjay raut alleges shivsainiks detained in shirdi kopargaon sangamner rahata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 09:51 PM

Topics:  

  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….
1

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.