Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut PC: ‘अजित पवारांचा पक्ष मुळात कधी अस्तित्वातच नव्हता; संजय राऊतांचे महायुतीवर टीकास्त्र

Sanjay Raut PC- अजित पवारांचा राष्ट्रवादी किंवा शिंदेंची शिवसेना हे मुळातच पक्ष नाहीत. अजित पवार हयात असतानाही हा कधीही पक्ष नव्हता. निवडणूक आयोगाच्या माध्यमाने या हे गट तयार झाले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: May 18, 2026 | 01:28 PM
Manoj Jarange, Sanjay Raut, Maratha Reservation, Mumbai News

Manoj Jarange, Sanjay Raut, Maratha Reservation, Mumbai News

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष फक्त शरद पवारांचा आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचीच – संजय राऊत
  • निवडणूक आयोगाच्या मदतीने तयार झालेले हे गट केवळ दबावाखाली एकत्र आलेले लोक – संजय राऊत
  • अजित पवारांच्या पश्चात पक्षात सुरू असलेला राष्ट्रीय कार्यकारिणीचा वाद हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या ‘कर्माची फळे’
Sanjay Raut PC: “राष्ट्रवादी काँग्रेसचा मूळ पक्ष हा शरद पवार यांचाच आहे. सध्या जे काही सुरू आहे, ते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या कर्माची फळे आहेत.” अजित पवार यांना वेगळा मार्ग स्वीकारण्यासाठी पुढे करणारे नेतेच आता त्याचे परिणाम भोगत आहेत, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जहरी टिका केली. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद सातत्याने चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. महापालिकांच्या निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत्या. पण अजित पवारांच्या निधनानंतर या चर्चांना पूर्णविराम लागला. पण आता पुन्हा एकदा या चर्चा सुरू झाल्या आहेत.या चर्चा सुरू असतानाच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचे पक्षांतर्गत वादही समोर येऊ लागले आहेत.  याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर सडकून टिका केली आहे.

“महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारने एवढं केलं नसेल,” जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून फडणवीसांचे खडेबोल

संजय राऊत म्हणाले, “अजित पवारांचा राष्ट्रवादी किंवा शिंदेंची शिवसेना हे मुळातच पक्ष नाहीत. अजित पवार हयात असतानाही हा कधीही पक्ष नव्हता. निवडणूक आयोगाच्या माध्यमाने या हे गट तयार झाले आहेत. पण राष्ट्रवादी हा मूळ पक्ष शरद पवार यांचा आणि शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे. आता त्यावर ३० जुलैला सुनावणी आहे. बाकी अजित पवार वगैरे पक्ष नाहीत. ते वेगळ गट होते. दबावाखाली लोक फूटले आणि बाजूला गेले.

पक्षांना काही विचारधारा आणि भूमिका असतात पण या दोन पक्षाकडे त्या आहेत का, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला. तसेच, शिंदेची विचारधारा बाळासाहेब ठाकरे आणि अजित पवारांच्या पक्षाची विचारधारा शरद पवारांच्या पक्षासारखी आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.

“ही त्यांच्या कर्माची फळं”; प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यावर संजय राऊतांचा निशाणा

संजय राऊत यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तचकरे यांच्यावर टीका केली. पार्थ पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे तक्रार केल्याची चर्चा सुरू असताना राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.  संजय राऊत म्हणाले, “मला त्याबाबत माहिती नाही. पण ही त्यांच्या कर्माची फळं आहेत,” असे राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले, “अजित पवार यांचं डोकं फिरवण्यात जे काही प्रमुख लोक होते, त्यामध्ये धनंजय मुंढ, प्रफुल्ल पटेल यांसारख्या नेत्यांचा समावेश होता. आज त्यांनाच त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.”

राष्ट्रवादीत अंतर्गत कलह, पार्थ पवारांनी घेतली फडणवीसांची भेट

“भाजपाला सुखाची आणि अय्याशीची चटक लागली”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आणि इंधन बचतीच्या आवाहनावरही राऊत यांनी टीका केली. “भारतीय जनता पार्टीला सुखाची आणि अय्याशीची चटक लागली आहे. ढोंग करण्याची सवय त्यांना झाली आहे,” असा आरोप त्यांनी केला. “भाजपने या ढोंगी प्रवृत्तीतून बाहेर पडले पाहिजे. राष्ट्र संकटात आहे, हे निवडणुका संपल्यानंतरच कळाले का? महागाई वाढणार आहे, हे निकालानंतर समजले का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक नाड्या भाजपाच्या हातात आहेत. त्यामुळेच जनता गरीब होत चालली आहे. ही चिंता पंतप्रधानांनी नेदरलँडमधून व्यक्त केली. त्यांनी इथे येऊन देशातील परिस्थितीकडे पाहावे. देशाची संस्कृती रसातळाला जात आहे, तर नेदरलँड पाहण्यासाठी त्यांचे राष्ट्र सक्षम आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

 

 

Web Title: Sanjay raut criticized sunil tatkare and praful patel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • sanjay raut
  • Sharad Pawar NCP

संबंधित बातम्या

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं
1

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
2

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.