Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ठाकरे गटाच्या स्थितीस संजय राऊत जबाबदार, उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण’; शिंदे गटाच्या नेत्याचा टोला

एका व्यक्तीवरील अतिविश्वासामुळे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आज ज्या स्थितीत आणून ठेवली आहे, त्याबाबत आता फारसे बोलण्यासारखे उरलेले नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 18, 2026 | 08:01 AM
जयंत पाटील-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

जयंत पाटील-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us
Follow Us:

नागपूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. आता हा गट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या आजच्या स्थितीसाठी खासदार संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

एका व्यक्तीवरील अतिविश्वासामुळे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आज ज्या स्थितीत आणून ठेवली आहे, त्याबाबत आता फारसे बोलण्यासारखे उरलेले नाही. ठाकरे गटाच्या खासदारांच्या दिल्ली दौऱ्यासह पक्षात घडणाऱ्या अलीकडील घटनांचा विचार करून वारंवार बंडखोरी का होत आहे, यावर उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला आशिष जयस्वाल यांनी विमानतळावर मीडियाशी बोलताना दिला.

‘लग्न एकासोबत करायचं अन् पळून दुसऱ्यासोबत…’, फोडाफोडीच्या राजकारणावर रोहित पवार कडाडले; थेट सांगितला खासदारांचा ‘रेट’

दरम्यान, ठाकरे गटात सातत्याने असंतोष आणि गटबाजी वाढताना दिसत असल्याचा दावा करत जयस्वाल म्हणाले, पक्षात वेगवेगळे गट निर्माण होत आहेत. त्यामुळे नेतृत्वाने नेमकी चूक कुठे होत आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. याउलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जनतेचा वाढता पाठिंबा मिळत आहे.

शिंदे गटात दररोज प्रवेश

शिंदे गटात दररोज मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा प्रवेश होत असल्याचा दावा करताना भविष्यात खासदार आणि आमदारही पक्षात प्रवेश करणार का, असा प्रश्न विचारला असता जयस्वाल यांनी, काय घडते ते लवकरच समजेल, असे सूचक उत्तर दिले.

सावध राहण्याचा सल्ला

संजय राऊत यांच्यावर आता कुणाचाही नियंत्रण राहिलेले दिसत नाही. सर्व काही गमावल्यानंतर शहाणपण येण्यात काही अर्थ नसतो, असा टोला जयस्वाल यांनी लगावला. तसेच राऊत यांच्या विरोधात त्यांच्या गटात कुणीही उघडपणे बोलू शकत नसल्याचा दावा करत उद्धव ठाकरे यांना यापूर्वीच त्यांच्याबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला होता, असेही त्यांनी सांगितले.

Uddhav Thackeray MLA : ६ खासदार गेले, आता १६ आमदारांची बारी? एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे ठाकरे गटात पुन्हा ‘धकधक’

Web Title: Sanjay raut is responsible for the state of the thackeray group says ashish jaiswal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • Ashish Jaiswal
  • Operation Tiger
  • sanjay raut
  • Shivsena Politics

संबंधित बातम्या

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….
1

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप
2

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला
3

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.