KDMC Election Results: कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; मनसेचा शिंदे गटाला पाठिंबा
कोकण भवन येथे झालेल्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मनसेकडून शिवसेना (शिंदे) गटाला अधिकृत पाठिंबा मिळाल्याची घोषणा केली. (Maharashtra Municipal Corporation Election 2026 )
Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
यावेळी बोलताना डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “आज शिवसेना (शिंदे) गटाने आपल्या ५३ नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. तसेच मनसेनेही त्यांच्या ५ नगरसेवकांचा गट स्थापन करत आम्हाला समर्थन दिले आहे. आम्ही महायुतीतून निवडणूक लढलो असून, कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार आहे.” या घडामोडीमुळे केडीएमसीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, कल्याण डोंबिवलीत शिंदे गट आणि मनसे ने एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिंदे गट सर्वात मोठा पक्ष ठरला. पण त्यानंतर कल्याण डोंबवलीत कोणत्या पक्षाचा महापौर होणार यावरून जोरदार चर्चा रंगल्या होत्या. या सगळ्या चर्चांच्या दरम्यान, शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे अचानक कोकण भवनात दाखल झाले. यासंदर्भात बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, महापौर महायुतीचाच होणार बाकी कुणाचाही नाही. पण भविष्यात कोणाला आमच्यासोबत यायचे असेल तर आम्ही विकासासाठी त्यांना सोबत घेऊ,” असे स्पष्ट शब्दात श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं.(BMC Electoin 2026)
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी ६२ नगरसेवकांचा बहुमताचा आकडा गाठणे निर्णायक ठरणार आहे. सध्या शिवसेना (शिंदे) गटाकडे ५३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे, तर भारतीय जनता पक्ष कडे ५० नगरसेवक आहेत.
महापालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ११ नगरसेवक निवडून आले होते, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे ५ नगरसेवक विजयी झाले होते. मात्र, निकालानंतर ठाकरे गटातील मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. हे दोन्ही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती.
सध्याच्या घडीला, मनसेचे निवडून आलेले ५ नगरसेवक आणि ठाकरे गटातून मनसेत गेलेले २ नगरसेवक, असे एकूण ७ नगरसेवक सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतात. शिंदे गटाचे नेते यासंदर्भात मनसेशी सातत्याने चर्चा करत असले, तरी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी ६२ नगरसेवकांचा बहुमताचा आकडा गाठणे निर्णायक ठरणार आहे. सध्या शिवसेना (शिंदे) गटाकडे ५३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे, तर भारतीय जनता पक्ष कडे ५० नगरसेवक आहेत.
महापालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ११ नगरसेवक निवडून आले होते, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे ५ नगरसेवक विजयी झाले होते. मात्र, निकालानंतर ठाकरे गटातील मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. हे दोन्ही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती.
दरम्यान, ठाकरे गट कोकण विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणीसाठी जात असताना आणखी दोन नगरसेवक गैरहजर राहिले. हे नगरसेवक मनसेच्या गोटात गेल्याची चर्चा असून, त्यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ ११ वरून थेट ७ वर आले. विशेष म्हणजे, मनसेत गेलेले हे दोन नगरसेवक पूर्वी मनसेचेच कार्यकर्ते होते. त्यामुळे “आम्ही पुन्हा मनसेत गेलो” अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतल्याचे समजते.