Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘क्रांती’चे अध्यक्ष शरद लाड यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षात दाखल

आज नव्या प्रवासाची सुरुवात करताना मनात भावनांचा महासागर उसळतो आहे. सामान्यातील सामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय मनाशी बाळगून, त्या दिशेने सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प करत मी भाजपमध्ये प्रवेश केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 09, 2025 | 08:10 AM
अखेर ' क्रांती ' चे अध्यक्ष शरद लाड यांचा भाजपा मध्ये प्रवेश

अखेर ' क्रांती ' चे अध्यक्ष शरद लाड यांचा भाजपा मध्ये प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:

पलूस : अनेक दिवसांपासून रेंगाळलेला क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये अखेर प्रवेश झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील मुख्यालयात शेकडो समर्थकांसह प्रवेश केला. यावेळी समर्थकांनी ‘शरद भाऊ आगे तुम बढो, हम तुम्हारे साथ है, पलूस कडेगावमध्ये एकच भाऊ शरद भाऊ शरद भाऊ’ या घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले.

प्रवक्ते नवनाथ बन यांनी स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्यात विकासाची नवी दिशा निर्माण झाली आहे. या मजबूत नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष अधिक सशक्त करण्यासाठी सर्वांनी सन्मान करणे आवश्यक आहे. शरद लाड यांनी आमच्यावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या विश्वासास पात्र राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.

शरद लाड म्हणाले, आज नव्या प्रवासाची सुरुवात करताना मनात भावनांचा महासागर उसळतो आहे. सामान्यातील सामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय मनाशी बाळगून, त्या दिशेने सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प करत मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. हा क्षण माझ्यासाठी आनंद, अभिमान आणि नव्या जबाबदारीची जाणीव घेऊन आलेला आहे. आपण आता एका ठाम विचारधारेच्या, राष्ट्रहित आणि जनकल्याणाला प्राधान्य देणाऱ्या पक्षाचे घटक बनत आहोत.

हेदेखील वाचा : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; 41 पैकी तब्बल 21 जागांवर महिलांना संधी

तसेच ‘देश प्रथम’ ही भावना अंतःकरणात बाळगून, खऱ्या अर्थाने विकासासाठी झटणाऱ्या या पक्षाचा ध्वज हातात घेणे हे माझ्यासाठी गौरवाचं आणि प्रेरणेचं कारण आहे. पलूस-कडेगावात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या झेंड्याखाली ताकदीने लढवणार आहे.

पक्षप्रवेश सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार सुधीर गाडगीळ, मनोज घोरपडे, सत्यजीत देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, अमल महाडीक, पृथ्वीराज देशमुख , संग्राम देशमुख, समीत कदम, राहुल महाडीक, अमोल बालवडकर, कौस्तुभ गावडे, राजाराम गरुड, पोपट सपकाळ, नितिन नवले, सुकुमार पाटील, संग्राम जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोण आहेत शरद लाड?

शरद लाड हे कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी.‌‌ बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. क्रांतीचे फिल्ड मार्शल, स्वातंत्र्यसेनानी जी. डी. बापू यांचे नातू आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णा लाड यांचे पुत्र आहेत. जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड यांचे पुतणे आहेत.

शरद लाड यांची राजकीय पार्श्वभूमी

लाड हे दोन दशकांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष पदापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ झाला. कुंडल जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले. जिल्हा परिषदेत गटनेते म्हणून काम केले. वडिल आमदार अरुण लाड यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सध्या ते पदवीधर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. भाजपने उमेदवारीचा ‘शब्द’ दिल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे बोलले जाते.

Web Title: Sharad lad finally joins bharatiya janata party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 08:10 AM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Satara News: लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करावा; सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरेंचे आवाहन
1

Satara News: लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करावा; सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरेंचे आवाहन

MLC Election 2026: विधान परिषदेसाठी काय आहे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला? सर्वाधिक जागांसाठी भाजपकडून रस्सीखेच ?
2

MLC Election 2026: विधान परिषदेसाठी काय आहे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला? सर्वाधिक जागांसाठी भाजपकडून रस्सीखेच ?

Rajya Sabha Election 2026: सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक; बड्या नेत्याच्या नावाची चर्चा
3

Rajya Sabha Election 2026: सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक; बड्या नेत्याच्या नावाची चर्चा

Maharashtra Breaking News Updates Today: कण्हेरीत ढगफुटीसदृश्य पाऊस; ओढ्यांना पूर 
4

Maharashtra Breaking News Updates Today: कण्हेरीत ढगफुटीसदृश्य पाऊस; ओढ्यांना पूर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.