Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून राहुल नार्वेकर विरुद्ध कपिल सिब्बल; ‘बिनबुडाचे आरोप’, विधानसभा अध्यक्षांचा पलटवार

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर अधिकारक्षेत्राचा मुद्दा उपस्थित केला. यावर नार्वेकरांनी आरोप फेटाळत आपला निर्णय कायद्याच्या चौकटीत असल्याचे स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Aug 18, 2026 | 08:47 PM
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून राहुल नार्वेकर विरुद्ध कपिल सिब्बल

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून राहुल नार्वेकर विरुद्ध कपिल सिब्बल

Follow Us
Follow Us:
  • कपिल सिब्बलांनी राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर अधिकारक्षेत्राचा सवाल उपस्थित केला.
  • ‘बिनबुडाचे आरोप’, म्हणत नार्वेकरांनी सिब्बलांच्या दाव्यांना प्रत्युत्तर दिले.
  • शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
 

मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाशी संबंधित प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत. सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या अधिकारक्षेत्रावरच आक्षेप घेतला.

सिब्बल यांच्या युक्तिवादानुसार, विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या पक्षघटनेशी संबंधित काही बाबींमध्ये हस्तक्षेप केला. निवडणूक आयोगाच्या नोंदींमध्ये उपलब्ध असलेल्या 1999 च्या पक्षघटनेचा आधार घेत अध्यक्षांनी निर्णय घेतल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

‘अध्यक्षांना हे अधिकार कुठून मिळाले?’

कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना विधानसभा अध्यक्षांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाचा व्हिप कोणाकडे होता, तसेच विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत कोणत्या आमदारांनी पक्षादेशाचे उल्लंघन केले, यासारख्या बाबींचा विचार करताना अध्यक्षांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली.

‘मी महाराष्ट्रातच राहणार, रिकामटेकड्यांना आनंद घेऊ द्या’; दिल्लीवारीच्या चर्चेवर फडणवीसांचा विरोधकांना टोला

सिब्बल यांनी असा सवाल उपस्थित केला की, शिवसेनेच्या पक्षघटनेशी संबंधित बाबींमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नेमका कुठून मिळाला? या मुद्द्यावरून सुनावणीत ठाकरे गटाने आपली भूमिका मांडली.

नार्वेकरांचा सिब्बलांना पलटवार

दरम्यान, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिब्बल हे त्यांच्या पक्षकाराच्या वतीने युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात, यावरून त्यांचे दावे सत्य ठरत नाहीत, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. आपण दिलेला निर्णय कायद्याच्या चौकटीत आणि सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या निकषांनुसारच असल्याचा दावा नार्वेकरांनी केला. तसेच, “अध्यक्षांनी काय ठरवलं हे त्यांना कसं समजलं?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘माझा निर्णय शाश्वत’

आपल्या निर्णयाबाबत केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत नार्वेकरांनी त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले. आपला निर्णय अत्यंत ठोस असून त्यात बदल होईल, असे आपल्याला वाटत नसल्याचेही त्यांनी म्हटले.

शिवसेना फुटीप्रकरणी उद्या पुन्हा होणार सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाने शिंदे गटात खळबळ

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीमुळे शिवसेना पक्ष, पक्षाचे नेतृत्व आणि निवडणूक चिन्हावरील अधिकाराचा वाद पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. आता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेते, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Shiv sena symbol case kapil sibal rahul narwekar supreme court hearing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • kapil sibal
  • Rahul Narvekar
  • shivsena
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

शिवसेना फुटीप्रकरणी उद्या पुन्हा होणार सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाने शिंदे गटात खळबळ
1

शिवसेना फुटीप्रकरणी उद्या पुन्हा होणार सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाने शिंदे गटात खळबळ

Nashik Potholes: नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल
2

Nashik Potholes: नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
3

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
4

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.