Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“कारण मी स्वतः संभ्रमात आहे…; शिवसेना नेते भास्कर जाधव यांचे खुले पत्र, चर्चांना उधाण

शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी शिवसैनिकांना उद्देशून खुले पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी गेलेल्या शिवसैनिकांना कारण विचारले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 30, 2025 | 04:00 PM
shivsena bhaskar jadhav open letter to shivsainik

shivsena bhaskar jadhav open letter to shivsainik

Follow Us
Follow Us:

मुंबई : मागील दोन वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये मोठी बंडखोरी झाली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. यामुळे राज्याच्या राजकारणाला मोठे वळण मिळाले. यानंतर देखील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून सत्तेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यावर आता ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पत्र लिहिले आहे. भास्कर जाधव यांनी शिवसेनेमधून गेलेल्या नेत्यांना उद्देशून हे खुले पत्र लिहिले आहे.

काय आहे भास्कर जाधव यांच्या पत्रामध्ये ?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी लिहिले आहे की, ’भास्कररावांवर आमचा राग नाही, मतदारसंघाचा व आमच्या भागाचा विकास हा भास्करराव यांनीच केला, कोट्यवधीचा निधी हा भास्कररावांच्या माध्यमातूनच आला…’ ही वाक्य व ही भाषा आहे गेल्या काही दिवसात पक्ष सोडून गेलेल्या लोकांची, आणि मग जाण्याचं कारण काय सांगतात तर आम्हाला सत्तेत जायचे आहे,आम्हाला विकास करून घ्यायचा आहे.

व्वा ! मला हा विषय तुम्हा सर्वांशी बोलावासा वाटला, कारण मी स्वतः संभ्रमात आहे. ज्या विकासाचे कारण देऊन तुम्ही अन्य पक्षात गेल्याचे स्वतःचे समर्थन करताय म्हणजेच स्वतःशी खोटं बोलून जनतेची फसवणूक करत आहात, यांची विकासाची नक्की व्याख्या काय? कोणता शाश्वत विकास यांना अपेक्षित आहे? स्पष्टपणे एखाद्या विशिष्ट कामाचा उल्लेख यांच्याकडून ऐकलात का आपण? बांधवानो- भगिनींनो, धादांत खोटं बोलून केवळ आणि केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी हा पक्षप्रवेश झाला आहे, हे तुमच्या लक्षात असूदे..

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

२००७ पासून मी गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे काम करायला सुरुवात केली त्यावेळेला कोणत्याही गावामध्ये एखादा सरपंच देखील आपल्या विचाराचा नव्हता. तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन, सर्वांशी आपुलकीने वागून, विरोधकांच्या धाकदपटशाही, लेखणीचा दहशतवाद व खोतीविरोधात लढून खऱ्या अर्थाने विकासाचे खरे रूप गुहागरला दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला… खाजगी मालकीच्या असलेल्या अनेक पायवाटा,विहिरी, रस्ते, सभागृह, पाणीयोजना मी जनतेसाठी मोकळ्या करून दिल्याच. त्याचबरोबर वाडी–वस्तीवर रस्ता, पाणी, वीज, पूल, सामाजिक सभागृह अशी कितीतरी विकासाची कामं करण्याचं भाग्य मला लाभलं.

दोन वेळा आलेल्या निसर्गाच्या संकटावेळी तुमच्या सर्वांच्या पाठी ठाम उभा राहून नुकसान भरपाई मिळवून देण्यासोबतच सर्वांचे जीवन पूर्ववत होण्यासाठी महाराष्ट्रातील सगळी यंत्रणा माझ्या गुहागरमध्ये आणली. लोकप्रतिनिधी म्हणून माझे हे कर्तव्य बजावण्यात मी कधी कसूर केलेलीच नाही, परंतु त्याही पलीकडे आपल्यापैकी अनेकांच्या वैयक्तिक अडचणीत मग पंचायत समिती असो, तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन असो, कुठे अपघात झाला असो व दवाखाना असो प्रत्येक प्रसंगात तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहिलो आहे. वैद्यकीय मदत करताना पुणे –मुंबईसारख्या ठिकाणी आपणाला सर्वोत्तम उपचार देण्यासाठी कायम झगडलो आहे. कोरोनासारख्या संकटात माझ्या स्वतःच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना घरात बसून न राहता आपणा सर्वांना योग्य उपचार मिळावेत, चाकरमानी सुखरूप आपल्या घरी यावेत म्हणून प्रसंगी अनेकांचा वाईटपणा देखील घेतला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

हे सगळं तुम्हाला माहित नाही का? शंभर टक्के तुम्हाला तुम्हा सगळ्यांना याची जाणीव आहे. मग मी परत याची उजळणी आज का करतोय? मित्रांनो, मी पण माणूस आहे, मला पण मन आहे. वेदना होतात मनाला… राजकारण करायला मला कोणी शिकवण्याची गरज नाही. ४० वर्ष मी याच क्षेत्रात आहे. एक गेला तर चार निर्माण करेन. परंतु मी आक्रमक असलो तरी अत्यंत संवेदनशील आहे, एवढी वर्ष जीवाभावाप्रमाणे जपलेली माणसं घर सोडून जातात तेव्हा दुःख तर होणारच ना?

बांधवांनो– भगिनींनो, मी कुणालाही कधी माझा कार्यकर्ता बोलत नाही. सर्वांना मी माझे सहकारी म्हणतो. त्यांच्याशी कार्यकर्त्या प्रमाणे कधीच वागलो नाही. हे जे सोडून गेलेत या सर्वांना कायम मानाचं ताट वाढलं आहे. घरातील सदस्य म्हणून भावा– बहिणीप्रमाणे यांच्याशी वागलो आहे.

जे गेलेत ते आता बाकी सर्वांना फोन करून आम्ही विकासाकरता गेलो आहोत, तुम्हीही आमच्यासोबत या, असं सांगत आहेत. थांबा, घाई करू नका. यापूर्वी जे गेले त्यांनी विकासाकरता किती पैसे आणले ? आणि कोणता विकास केला? हे जरा तपासून बघा. आणि आता जे गेलेत ते विकासाकरता किती पैसे आणणार आहेत? नक्की कोणता व कोणाचा विकास करणार आहेत? हेही जरा अनुभवा आणि पहा. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, कसल्याही भूलथापांना बळी पडू नका, यांच्या खोटेपणाच्या नादी लागू नका, विकास विकास काय घेऊन बसलात तुमचा भास्कर जाधव खंबीर आहे.

अजून माझी आमदारकीची चार वर्ष बाकी आहेत याची जाणीव स्वकीयांना नसली तरी विरोधकांना नक्की आहे. लाथ मारेन तिथे पाणी काढायची माझ्यात धमक आहे आणि हो त्याउपर याबाबतीत तुमच्या मनात कसलीही शंका असेल तर थेट माझ्याशी बोला. अफवांवर विश्वास ठेऊ नका. आपले सर्वांचे प्रेम तर माझ्यावर आहेच, त्यात अधिकची वाढ व्हावी ही अपेक्षा करतो आणि तुम्हाला सोबत घेऊन आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवत ठेवेन याची खात्री देतो..लवकरच गावी आणि मुंबईला जाहीर मेळावे घेणार आहे. त्यावेळेला भेटू आणि खूप काही बोलू…!! असे पत्र शिवसेना ठाकरे गटाचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी लिहिले आहे.

Web Title: Shivsena bhaskar jadhav open letter to shivsainik political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • Bhaskar Jadhav
  • political news
  • shivsena

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

महायुतीत पुन्हा खदखद? ‘आम्ही बंडखोरीचे बादशाह’ म्हणत उमेदवारीसाठी ‘बंडखोरी’चा इशारा
2

महायुतीत पुन्हा खदखद? ‘आम्ही बंडखोरीचे बादशाह’ म्हणत उमेदवारीसाठी ‘बंडखोरी’चा इशारा

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी
3

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
4

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.