Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनम वांगचुक प्रकरणावर सुषमा अंधारे आक्रमक; ‘सरकार पुरस्कृत गुंड’ म्हणत भाजप आणि पोलिसांवर निशाणा

दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातून सोनम वांगचुक यांना हटवून रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया तीव्र झाल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप सरकार आणि दिल्ली पोलिसांवर कठोर शब्दांत टीका करत लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्

  • By विवेक
Updated On: Jul 18, 2026 | 04:02 PM
सोनम वांगचुक प्रकरणावर सुषमा अंधारे आक्रमक; ‘सरकार पुरस्कृत गुंड’ म्हणत भाजप आणि पोलिसांवर निशाणा

सोनम वांगचुक प्रकरणावर सुषमा अंधारे आक्रमक; ‘सरकार पुरस्कृत गुंड’ म्हणत भाजप आणि पोलिसांवर निशाणा

Follow Us
Follow Us:
  • सोनम वांगचुक यांना हटवल्याप्रकरणी भाजप सरकार आणि दिल्ली पोलिसांवर सुषमा अंधारे यांचा जोरदार हल्लाबोल
  • अभिजीत दिपके यांच्यावर आंदोलनस्थळी शाईफेक; संबंधित महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात
  • गीतांजली अंग्मो यांनी वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्याचा केला आरोप
 

दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी हटवून रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 21 वा दिवस सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. NEET परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतर येथे आंदोलन सुरू होते. पोलिसांनी वांगचुक यांना ताब्यात घेऊन रुग्णालयात हलवले, तसेच आंदोलनाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनाही ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले.

सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक, ‘हे भ्याड सरकार आहे,’ म्हणत केला हल्लाबोल

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?

या घटनेनंतर सुषमा अंधारे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी सरकारवर लोकशाही आंदोलन दडपण्याचा आरोप करत म्हटले की, “आपले काळे कुकर्म झाकण्यासाठी पांढऱ्या चादरी घेऊन आलेले हे सरकार पुरस्कृत गुंड आहेत.” त्यांनी पुढे सरकारची भूमिका असंवेदनशील आणि निर्लज्ज असल्याचे म्हटले.

आपले काळे कुकर्म झाकण्यासाठी पांढऱ्या चादरी घेऊन आलेले हे सरकार पुरस्कृत गुंड आहेत,.
लोकशाही मार्गाने चाललेले आंदोलन ज्या भ्याड पद्धतीने आज भाजपने दडपून टाकण्याचा प्रयत्न केला याची निंदा फक्त भारतात नाही ती आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे.
सरकार नावाची यंत्रणा फक्त असंवेदनशीलच… pic.twitter.com/RA1MIMohzL
— SushmaTai Andhare (@andharesushama) July 18, 2026


अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये असा आरोप केला की, शांततापूर्ण आंदोलनाला भ्याड पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न झाला असून त्याची निंदा केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही होत आहे. “पाशवी बहुमत हे लोकशाहीसाठी घातक असते,” असे म्हणत त्यांनी सरकारच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक

दरम्यान, आंदोलनस्थळी आणखी एक वाद निर्माण झाला. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर अभिजीत दिपके यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली. याचवेळी एका महिलेने त्यांच्यावर शाईफेक केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित आंदोलकांनी संबंधित महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Abhijeet Dipke : सोनम वांगचुक यांना हटवल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलन पेटले; अभिजीत दिपकेंवर शाईफेक, उपोषणाची घोषणा

गीतांजली अंग्मो यांचे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो यांनीही पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली उच्च न्यायालयाने केवळ नियमित वैद्यकीय तपासणीचे निर्देश दिले होते; रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश नव्हते. तसेच काही वैद्यकीय अहवालांबाबत शंका असल्याने स्वतंत्र प्रयोगशाळेतून तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणामुळे जंतरमंतरवरील आंदोलनाला नवे वळण मिळाले असून, विरोधी पक्षांकडून केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र टीका सुरू झाली आहे.

Web Title: Sonam wangchuk protest sushma andhare bjp delhi police criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • Cockroach Janata Party
  • Sonam Wangchuk
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Ahijeet Dipke granted Bail : अभिजित दिपके यांना जामीन मंजूर, ‘या’ मोठ्या अटीवर सही केल्यावरच सुटका? दिल्ली पोलिसांनी दिली माहिती
1

Ahijeet Dipke granted Bail : अभिजित दिपके यांना जामीन मंजूर, ‘या’ मोठ्या अटीवर सही केल्यावरच सुटका? दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

Dharmendra Pradhan : ‘सत्तापालटासाठी आंदोलन?’ धर्मेंद्र प्रधानांचे गंभीर आरोप; राहुल गांधी, CJP वर साधला जोरदार निशाणा
2

Dharmendra Pradhan : ‘सत्तापालटासाठी आंदोलन?’ धर्मेंद्र प्रधानांचे गंभीर आरोप; राहुल गांधी, CJP वर साधला जोरदार निशाणा

Tiranga March : दिल्लीमध्ये तिरंगा आंदोलनाआधी मोठी घडामोड! अभिजीत दीपके यांच्या घरी पोलीस दाखल, कॅनॉट प्लेसमध्ये हाय अलर्ट
3

Tiranga March : दिल्लीमध्ये तिरंगा आंदोलनाआधी मोठी घडामोड! अभिजीत दीपके यांच्या घरी पोलीस दाखल, कॅनॉट प्लेसमध्ये हाय अलर्ट

Abhijeet Deepke : ‘त्या भाजपच्या बाजूने बोलू शकतात पण…’ इम्रान खानच्या नोटिशीवर अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया
4

Abhijeet Deepke : ‘त्या भाजपच्या बाजूने बोलू शकतात पण…’ इम्रान खानच्या नोटिशीवर अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.