Abhijeet Dipake News: सौरव दास यांच्या कुटुंबाला त्रास का दिला जातोय?; CJPच्या अभिजीत दीपकेंचा सवाल
Abhijeet Dipke News:सौरव दास जे काही करत आहे ते देशासाठी आहे. सौरवच्या एका व्हिडिओनंतर, बार कौन्सिलच्या अध्यक्षांनी तात्काळ आपली अधिसूचना मागे घेतली. यामुळे सर्व कायद्याच्या विद्यार्थ्यांचे भविष्य वाचले. सौरव देशासाठी चांगले काम करत आहे. तो देशातील कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी चांगले काम करत आहे. त्याला जाणूनबुजून का त्रास दिला जात आहे? असा सवाल कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपक यांनी उपस्थित केला आहे.
माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, “दिल्लीत एका यूट्यूबरने सौरव यांच्या घरात घुसखोरी केली. सौरव दास आणि त्याच्या कुटुंबाला जाणूनबुजून का त्रास दिला जात आहे, तो काय करतो हे विचारण्याची काय गरज होती? या सगळ्यात त्याच्या आईला गोवण्याची काय गरज होती? असे व्हायला नको होते.”
सौरव दासने बुधवारी (१२ ऑगस्ट) माध्यमांशी बोलताना पुद्दुचेरी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना धमकावल्याचे गंभीर आरोप केले होते. पण पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला. पुदुचेरी पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सौरव दास यांच्या नातेवाईकांच्या घरी पोलिसांनी भेट दिल्याचे दुजोरा दिला. परंतु ही एक नियमित प्रक्रिया असल्याचे सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, स्वातंत्र्यदिनासारख्या महत्त्वाच्या प्रसंगांपूर्वी, सुरक्षेच्या कारणास्तव महत्त्वाच्या रस्त्यांजवळ राहणाऱ्या लोकांना काही प्रश्न विचारण्यासाठी भेट दिली जाते. या भेटीदरम्यान, लोकांना सुरक्षेसंदर्भात काही सर्वसाधारण प्रश्न विचारले जातात. अशा चौकशांचा उद्देश कोणालाही त्रास देणे किंवा घाबरवणे हा नसतो. त्यांनी सौरव दास यांच्या कुटुंबीयांना धमक्या मिळत असल्याचा आरोप खोटा असल्याचे फेटाळून लावला.
सौरव दास यांनी आरोप केली की, पुदुचेरी पोलीस घटनेच्या सुमारे दोन तास आधी त्यांच्या घरी पोहोचले होते. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांची वारंवार चौकशी केली. ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये दास यांनी लिहिले, “पुदुचेरी पोलीस, हा त्रास का? हा आदेश कोणी दिला आणि कोणत्या उद्देशाने? ही कायदेशीर प्रक्रिया आहे का? पुदुचेरीमधील भाजप सरकार माझ्या कुटुंबाला का घाबरवत आहे? ही पुदुचेरी सरकारची पद्धत नाही. हे केंद्र सरकारच्या सांगण्यावरून केले जात आहे. मला गप्प बसवण्यासाठी घाबरवण्याचा हेतू असेल, तर तो यशस्वी होणार नाही. मी याला घाबरणार नाही. यामुळे आमचा एक चांगला संकल्प अधिक दृढ होतो, जिथे पोलीस गुंडांसारखे वागण्याऐवजी कायद्याचे पालन करतील.”
शाळांच्या स्थितीबद्दल ते म्हणाले, “स्वातंत्र्यानंतरही देशातील मुले अजूनही मूलभूत सुविधांसाठी आसुसलेली आहेत. हे बदलले पाहिजे. जोपर्यंत आपण हे बदलत नाही, तोपर्यंत आपला देश खऱ्या अर्थाने प्रगती करणार नाही.”

