Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पुन्हा सुरु झाल्या चर्चा; सुनेत्रा पवार राजी, पण प्रफुल्ल पटेल अन् तटकरे…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणानंतर पक्षाची सूत्रे पुन्हा शरद पवार यांच्या हाती जातील. यामुळे दुसऱ्या गटातील नेत्यांचे वर्चस्व वाढून आपली राजकीय किंमत शून्य होईल, अशी भीती पटेल आणि तटकरे यांना सतावत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 04, 2026 | 07:20 AM
NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पुन्हा सुरु झाल्या चर्चा; सुनेत्रा पवार राजी, पण प्रफुल्ल पटेल अन् तटकरे...

NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पुन्हा सुरु झाल्या चर्चा; सुनेत्रा पवार राजी, पण प्रफुल्ल पटेल अन् तटकरे...

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढत आहे. सूत्रांनुसार, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे (अजित आणि शरद पवार) विलीनीकरण करण्यास पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार तयार आहेत. मात्र, पक्षाचे दोन ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी या प्रस्तावाचा कडाडून विरोध केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणानंतर पक्षाची सूत्रे पुन्हा शरद पवार यांच्या हाती जातील. यामुळे दुसऱ्या गटातील नेत्यांचे वर्चस्व वाढून आपली राजकीय किंमत शून्य होईल, अशी भीती पटेल आणि तटकरे यांना सतावत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात पटेल आणि तटकरे सावलीसारखे सोबत असायचे. मात्र, यावेळी त्यांनी अंतर राखल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी भेट घेतली. विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान पटेल यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की, राष्ट्रवादीचे संयुक्त नेतृत्व कोणाकडे असेल? विलीनीकरण झाल्यास शरद पवार गटाचे वर्चस्व वाढेल आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात, असे संकेत पटेलांनी दिले आहेत.

आमची भूमिका काय?

या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी थेट सवाल केला की, विलीनीकरणानंतर पक्षात त्यांचे स्थान काय असेल? यावर सुनेत्रा पवार यांनी पटेल यांना आश्वस्त केले की, आपल्या गटातील नेत्यांचे महत्त्व कायम राखले जाईल आणि कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. पटेल आणि तटकरे यांना भीती आहे की, विलीनीकरणानंतर ते शरद पवारांच्या निशाण्यावर असतील. कारण, राष्ट्रवादी फोडण्यामागे या दोन नेत्यांचीच मुख्य भूमिका होती, असे खुद्द शरद पवार मानतात.

राष्ट्रवादीची सूत्रे कोणाकडे जाणार?

जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध होता, तेव्हा अजित पवार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष चालवत होते. कोणत्याही पक्षनेत्याने त्यांना आव्हान देण्याचे धाडस केले नाही. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर, पक्षाची संपूर्ण निर्णय प्रक्रिया त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ यांच्या हाती आली आहे. पक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नियंत्रणाखाली येऊ नये म्हणून, सुनेत्रा पवार यांनी अजित यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि राज्यातील राजकारणाचा (Political News) नवा अध्याय सुरु झाला.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : राष्ट्रवादीवर नेतृत्व कोणाचं? सुनेत्रा पवार की तटकरे अन् पटेलांचं? वर्चस्वाची लढाई सुरु

Web Title: Sunetra pawar is ready for ncps merger and praful patel and tatkare not agree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 07:15 AM

Topics:  

  • NCP Politics
  • praful patel
  • Sunetra Pawar
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार का? दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, ‘पक्षाचे…’
1

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार का? दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, ‘पक्षाचे…’

‘मुदत संपली तरी खुर्ची कायम, विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे श्रीकांत शिंदे यांची मागणी
2

‘मुदत संपली तरी खुर्ची कायम, विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे श्रीकांत शिंदे यांची मागणी

Baramati News: बारामती नगरपरिषदेला १ कोटींची अत्याधुनिक सीवर मशीन; ‘मॅनहोलकडून मशीनहोलकडे’ स्वच्छता व्यवस्थेत नवे पर्व
3

Baramati News: बारामती नगरपरिषदेला १ कोटींची अत्याधुनिक सीवर मशीन; ‘मॅनहोलकडून मशीनहोलकडे’ स्वच्छता व्यवस्थेत नवे पर्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.