Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महेंद्र थोरवेंच्या विरोधात सुनील तटकरेंचा ६५ कोटींचा मानहानी दावा; नेमकं घडलं तरी काय ?

रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कर्जतचे शिंदेगट शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरुद्ध तब्बल 65 कोटी 3 हजार रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 15, 2026 | 02:10 PM
महेंद्र थोरवेंच्या विरोधात सुनील तटकरेंचा ६५ कोटींचा मानहानी दावा; नेमकं घडलं तरी काय ?
Follow Us
Follow Us:
  • महेंद्र थोरवेंच्या विरोधात सुनील तटकरेंचा ६५ कोटींचा मानहानी दावा;
  • नेमकं घडलं तरी काय ?
अलिबाग : रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कर्जतचे शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरुद्ध तब्बल 65 कोटी 3 हजार रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला. या प्रकरणाने रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. माणगाव येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला असून, त्यासाठी तीन लाख रुपयांचे न्यायालयीन शुल्कही भरल्याची माहिती समोर आली आहे.

खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान उद्भवलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर खोपोली येथील मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर हे प्रकरण अधिक चिघळलं होतं. 27 डिसेंबर 2025 रोजी आमदार थोरवे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते असं दाव्यात नमूद करण्यात आले आहे. तटकरे रायगड जिल्ह्याचे ‘आका’ असल्याप्रमाणे वागतात आणि काही कार्यकर्त्यांच्या हत्यांमागे त्यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप थोरवे यांनी केल्याचं तटकरेंनी म्हटले आहे. या प्रकरणामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवल विकोपाला जात आहेत. या सगळ्या संवेदनशील प्रकरणात न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगलीत ‘ऑपरेशन लोटस’ टाळण्यासाठी आघाडीने केली ‘अशी’ खेळी; जिल्हा परिषदेच्या 36 सदस्यांना थेट…

खासदार तटकरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हे विधान पूर्णपणे खोटे व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे. गेल्या तीन दशकांच्या सार्वजनिक जीवनात आपण विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असून अशा आरोपांमुळे आपली प्रतिमा गुन्हेगारी प्रवृत्तीशी जोडली जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या विधानांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचा आरोपही दाव्यात करण्यात आला आहे.

न्यायालयाकडे तीन प्रमुख मागण्या
दाव्यात खासदार तटकरे यांनी न्यायालयाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. आमदार थोरवे यांनी केलेले आरोप खोटे व मानहानीकारक असल्याचे जाहीर करावे, बदनामी करणारे व्हिडिओ सर्व माध्यमांवरून हटवावेत आणि भविष्यात अशा प्रकारची विधाने करण्यास त्यांना मनाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मानसिक व सामाजिक नुकसानीपोटी 65 कोटी 3 हजार रुपयांची भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Ritu Tawde Controversy : मुंबईच्या महापौर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; रितू तावडे यांचा लाल दिव्याच्या गाडीतून प्रवास

Web Title: Sunil tatkare files defamation claim of rs 65 crore against mahendra thorve

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Mahendra Thorve
  • Nationalist Congress Party
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा
1

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा

NCP Mumbai President: पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे; झिशान सिद्दीकींवर मुंबईची जबाबदारी?
2

NCP Mumbai President: पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे; झिशान सिद्दीकींवर मुंबईची जबाबदारी?

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’
3

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’

प्रशांत किशोरांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीत खळबळ; सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरून अनिल पाटील यांची स्पष्ट भूमिका
4

प्रशांत किशोरांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीत खळबळ; सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरून अनिल पाटील यांची स्पष्ट भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.