Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून सुनेत्रा पवार नाराज? सुनील तटकरे यांनी दिलं स्पष्ट उत्तर

सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट राजकीय नव्हती, असे स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिले. सुनेत्रा पवार नाराज असल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या.

  • By विवेक
Updated On: Jul 17, 2026 | 03:55 PM
Sunil Tatkare NCP, Bombay High Court Aurangabad Bench,

Sunil Tatkare NCP, Bombay High Court Aurangabad Bench,

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट राजकीय नसून विकासकामांसाठी होती, सुनील तटकरे यांनी केले स्पष्ट
  • सुनेत्रा पवार नाराज असल्याच्या चर्चांना तटकरे यांनी लावले फेटाळून
  • ‘सुनेत्रा पवार आमच्या नेत्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंघ आहे’ – सुनील तटकरे
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी घेतलेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. राज्यातील राजकीय वातावरणात आधीच मोठ्या घडामोडी घडत असताना या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. या भेटीबाबत सुनेत्रा पवार यांना माहिती नव्हती आणि त्या नाराज आहेत, अशा चर्चादेखील रंगल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चांवर आता सुनील तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

‘जयंत पाटील आणि आमची भेट एकत्र झाली नव्हती’

पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “जयंत पाटील आणि आमची वर्षा बंगल्यावर एकत्र भेट झाली नव्हती. जयंत पाटील त्यांच्या मतदारसंघातील अपात्र नगराध्यक्षांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते,” अशी माहिती त्यांनी दिली.

जयंत पाटील-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ‘रामदास आठवलेंना भेटले तर…’

तटकरे यांनी सांगितले की, त्यांनी आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गेल्या आठवड्यातच वेळ मागितली होती. संसद अधिवेशन सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारकडे पाठवायच्या विविध प्रस्तावांबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती. ते म्हणाले, “दापोली पर्यटन विकासासह काही महत्त्वाचे प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्राकडे पाठवायचे आहेत. त्यासाठी संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी समन्वय साधायचा होता. मुख्यमंत्री उपलब्ध असल्याने त्यांनी आम्हाला भेटीसाठी वेळ दिला.”

‘ही राजकीय भेट नव्हती’

सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की, “जर ही राजकीय भेट असती तर त्याबाबत निश्चितच सुनेत्रा पवार यांना माहिती दिली गेली असती. मात्र ही भेट पूर्णपणे प्रशासकीय आणि विकासकामांसाठी होती.”

कोअर कमिटी बैठकीचाही उल्लेख करत तटकरे म्हणाले की, बैठकीत मतदार यादी विशेष पुनरावलोकन (SIR), स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या जयंतीचे नियोजन आणि इतर संघटनात्मक विषयांवर चर्चा झाली. सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले, “वहिनी (सुनेत्रा पवार) आमच्या नेत्या आहेत. अजितदादांबद्दल आमच्या मनात जो आदर आहे, तोच आदर सुनेत्रा पवार यांच्याबद्दलही आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस नेटाने पुढे वाटचाल करत आहे.”

Maharashtra Politics: जयंत पाटलांना अर्थखाते मिळणार? राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांसोबत गुप्त बैठकांचे सत्र सुरूच

Web Title: Sunil tatkare on devendra fadnavis meeting sunetra pawar reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • praful patel
  • Sunetra Pawar
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला
1

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
2

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

‘अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांनी साथ द्यावी’; सुनेत्रा पवारांचे भावनिक आवाहन
3

‘अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांनी साथ द्यावी’; सुनेत्रा पवारांचे भावनिक आवाहन

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
4

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.