Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: धाराशिवमध्ये भीषण अपघात; BLO कामावरून परतणाऱ्या शिक्षकाचा जागीच मृत्यू

धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे पेट्रोल पंपासमोर झालेल्या भीषण अपघात झाला. BLO चे शासकीय काम पूर्ण करून दुचाकीवरून घरी परतत असताना भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 09, 2026 | 06:53 PM
धाराशिवमध्ये भीषण अपघात; BLO कामावरून परतणाऱ्या शिक्षकाचा जागीच मृत्यू

धाराशिवमध्ये भीषण अपघात; BLO कामावरून परतणाऱ्या शिक्षकाचा जागीच मृत्यू

Follow Us
Follow Us:

धाराशिव, प्रतिनिधी : धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे पेट्रोल पंपासमोर झालेल्या भीषण अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. BLO चे शासकीय काम पूर्ण करून परतत असताना चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत कनगरा (ता. धाराशिव) येथील रहिवासी तथा बेंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक गोविंद इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद इंगळे हे निवडणूक विभागाच्या BLO कामानिमित्त दिवसभर शासकीय जबाबदारी पार पाडून आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते. दरम्यान, बेंबळी येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, इंगळे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. गोविंद इंगळे हे शांत, कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कनगरा व बेंबळी परिसरात शोककळा पसरली आहे. अनेक शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर सुपाऱ्या आणि शाईफेक; जालन्यात राजकीय वातावरण तापले

दरम्यान, या अपघातानंतर संबंधित रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याचे काम अत्यंत हलक्या प्रतीचे करण्यात आले असून अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे उंचवटे, खड्डे आणि धोकादायक ‘जम्पिंग पॉईंट’ निर्माण झाले आहेत. याशिवाय आवश्यक ठिकाणी गतिरोधक, दिशादर्शक फलक, वेगमर्यादा सूचना किंवा इशारा फलक नसल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत आहे. या मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून अनेकांनी जीव गमावल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत संबंधित ठेकेदार आणि कामाची देखरेख करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “निकृष्ट दर्जाचे रस्ते काम आणि प्रशासनाची निष्काळजीपणा यामुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत. या मृत्यूला केवळ अपघात म्हणून पाहता येणार नाही,” असे धुरगुडे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात त्यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या रस्त्याची तातडीने तांत्रिक चौकशी करून सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा एकदा जिल्ह्यातील निकृष्ट रस्ते कामाचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रशासन किती गंभीर आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

70% Quota Bhumiputra: जिल्हा बँकांमधील ७० टक्के जागा आता ‘भूमिपुत्रां’साठी राखीव; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Web Title: Dharashiv bembli teacher govind ingle road accident death road quality issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 06:53 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Nationalist Congress Party
  • Road Accident

संबंधित बातम्या

तामलवाडी टोलनाक्यावर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन
1

तामलवाडी टोलनाक्यावर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Dharashiv Zilla Parishad: महिला उद्योजकतेला बळ! प्रत्येक कर्जप्रकरणासाठी सीआरपींना ₹१ हजार; धाराशिवचा राज्यात पहिला प्रयोग
2

Dharashiv Zilla Parishad: महिला उद्योजकतेला बळ! प्रत्येक कर्जप्रकरणासाठी सीआरपींना ₹१ हजार; धाराशिवचा राज्यात पहिला प्रयोग

Maharashtra Politics: भाजप-राष्ट्रवादीला धक्का! संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटेंची ठाकरे गटात एन्ट्री; धाराशिवच्या राजकारणात खळबळ
3

Maharashtra Politics: भाजप-राष्ट्रवादीला धक्का! संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटेंची ठाकरे गटात एन्ट्री; धाराशिवच्या राजकारणात खळबळ

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
4

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.