Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी

Shiv Sena Symbol Case Supreme Court: शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटले म्हणजे ते स्वतंत्र राजकीय पक्ष ठरत नाहीत, असा दावा केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 19, 2026 | 03:50 PM
‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

Follow Us
Follow Us:
  • धनुष्यबाण गोठवण्याची सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी
  • कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद
  • शिवसेना-धनुष्यबाणावर सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
Shiv Sena Symbol Case Supreme Court: महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा ठरलेला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. आज कोर्टात नेमकं काय काय घडलं? जाणून घेऊया सविस्तर बातमी…

‘एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटले म्हणजे राजकीय पक्ष होत नाही’

कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने त्यांचा स्वतंत्र राजकीय पक्ष निर्माण होत नाही, असा मुद्दा मांडला. शिवसेना हा मूळ पक्ष असून केवळ काही आमदार वेगळे झाल्याने पक्षाची मालकी किंवा पक्षाचे स्वरूप बदलत नाही, असा ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे. ‘शिवसेना ठाकरेंचा पक्ष आहे, शिवसेना शिंदेंची होऊ शकत नाही,’ असा दावा सिब्बल यांनी केला.

Maharashtra Politics: मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार! महायुती सरकारच्या नव्या नियमावलीने मंत्रिमंडळात खळबळ

धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी

या सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण हे शिवसेनेचे पारंपरिक निवडणूक चिन्ह गोठवावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली. पक्षाच्या मालकीचा वाद न्यायालयीन प्रक्रियेत असताना चिन्हाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत ते गोठवण्याची भूमिका ठाकरे गटाने मांडली आहे.

२०१८ च्या ठरावाचा संदर्भ

सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात २०१८ मध्ये झालेल्या पक्षाच्या ठरावाचा संदर्भ दिला. त्या ठरावानुसार उद्धव ठाकरे यांना पक्षातील मोठा पाठिंबा होता, असा दावा त्यांनी केला. तसेच तत्कालीन विधानसभा गटनेते सुनील प्रभू यांनी बजावलेल्या व्हीपचे उल्लंघन करून काही आमदार बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे संबंधित आमदार त्याच वेळी अपात्र ठरायला हवे होते, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. त्यांच्या मते, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय वेळेत झाला असता तर त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा प्रश्नच निर्माण झाला नसता.

सिब्बलांचा युक्तिवाद संपला

कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीने केलेला युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर आता देवदत्त कामत सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहेत. या प्रकरणातील पुढील सुनावणीकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षावरील दावा, आमदारांची अपात्रता आणि धनुष्यबाण चिन्हावर कोणाचा अधिकार राहणार, या तीनही मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे.

Supreme Court on CJP Protest: जंतरमंतरवरील आंदोलन, महिला, मुलींचे लैंगिक छळ…; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Web Title: Supreme court shiv sena bow arrow symbol uddhav thackeray kapil sibal argument

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Shiv Sena
  • Supreme Court
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण
1

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
2

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Thackeray Brothers Morcha: हुकूमशाहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातून; ठाकरे बंधूंची  ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीची मागणी
3

Thackeray Brothers Morcha: हुकूमशाहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातून; ठाकरे बंधूंची ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीची मागणी

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल
4

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.