Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supriya Sule on MPSC Paper leak : MPSC पेपरफुटीवर सुप्रिया सुळे आक्रमक; ‘चूक यंत्रणेची आणि सरकारची’, आत्महत्येच्या धमकीचा फोन ?

Supriya Sule on MPSC Paper leak : MPSC पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला थेट सवाल केले आहेत. ‘चूक यंत्रणेची आणि सरकारची आहे’, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Sep 10, 2026 | 03:22 PM
Supriya Sule

Supriya Sule

Follow Us
Follow Us:
  • MPSC पेपरफुटीवर सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरलं.
  • आत्महत्या करणार असल्याचा महिलेचा फोन आल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा.
  • अजित पवारांच्या मृत्यूबाबतच्या चर्चेवर बोलण्यास सुप्रिया सुळेंचा स्पष्ट नकार.
 

Supriya Sule on MPSC Paper leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांचा हा प्रश्न तातडीने सोडवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “हा अतिशय गंभीर विषय आहे. मुख्यमंत्री सध्या नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी गेले आहेत. मात्र, या सगळ्या कार्यक्रमांपेक्षा सध्या MPSC आणि दुष्काळाच्या प्रश्नाला प्राधान्य दिलं पाहिजे,” असं त्या म्हणाल्या.

‘न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करणार,’ सुळेंनी सांगितला धक्कादायक अनुभव

यावेळी सुप्रिया सुळेंनी एक धक्कादायक अनुभवही सांगितला. त्या म्हणाल्या, “काल रात्री १२ वाजून १२ मिनिटांनी एका महिलेचा फोन आला होता. संबंधित महिला रडत होती आणि न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करणार असल्याचं ती सांगत होती. या प्रकारामुळे आपण घाबरलो आणि त्या फोनचा स्क्रीनशॉट पोलिसांना पाठवला,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Student Suicide: पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमधून समोर आले धक्कादायक कारण…

‘आपलेच पेपर कसे फुटत आहेत?’

यावेळी सुप्रिया सुळे यांनी पेपरफुटीच्या मुद्यावरून सरकारला घेरत “आपलेच पेपर कसे फुटत आहेत?” असा थेट सवालही सरकारला केला. “आज AIच्या क्षेत्रात बारामती-साताऱ्यातील शेतकरीही उतरला आहे. मग महाराष्ट्र सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा यंत्रणा सुरक्षित का करू शकत नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“चूक यंत्रणेची आणि सरकारची आहे. यापुढे यंत्रणेत सुधारणा झाली पाहिजे,” असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना तातडीने बोलावून हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी केली. हा प्रश्न केवळ काही विद्यार्थ्यांचा नसून अशा अनेक प्रकरणांचा असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Sanjay Raut Criticized BJP: प्राथमिक शाळेत कांदा, बटाटा, लसूण खाण्यास बंदी! संजय राऊतांचा शाळा व्यवस्थापनाला इशारा

अजित पवारांच्या मृत्यूच्या चर्चेवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या मुद्द्यावरून विरोधकांनी हा विषय सोडू नये, अशी भूमिका मांडली होती. यावर सुप्रिया सुळे यांनी मात्र “मी या विषयावर बोलणार नाही”, असं स्पष्ट केलं.

“संजय राऊत हे राज्याचेच नव्हे तर देशाचे मोठे नेते आहेत. मात्र, या विषयावर सरकारलाच प्रश्न विचारला पाहिजे. लोकांना आपण या विषयावर बोललेलं आवडत नाही,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Web Title: Supriya sule on mpsc paper leak pune students protest government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • MPSC
  • MPSC Paper Leak
  • NCP Sharad Pawar
  • supriya sule

संबंधित बातम्या

Student Suicide: पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमधून समोर आले धक्कादायक कारण…
1

Student Suicide: पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमधून समोर आले धक्कादायक कारण…

विद्यार्थ्यांच्या रोषाची धग वाढली! MPSC च्या कारभाराविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी रस्त्यावर
2

विद्यार्थ्यांच्या रोषाची धग वाढली! MPSC च्या कारभाराविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी रस्त्यावर

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी
3

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण
4

MPSC Paper Leal Controversy : ‘पुरावा दिलात तर क्षणभरही पदावर राहणार नाही’, MPSC अध्यक्ष भीमनवारांचं स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.