Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विलीनीकरण? सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान; ‘सध्या देश वाचवण्याची गरज…’

एकीकडे राज्यात विधान परिषद निवडणुकांचे बिगुल वाजलेले असताना आता दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्र्रवादि काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीनीकरण होत असल्याच्या चर्चाना जोर आला आहे. आता यावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 13, 2026 | 05:00 PM
MP Supriya sule

MP Supriya sule

Follow Us
Follow Us:

एकीकडे राज्यात विधान परिषद निवडणुकांचे बिगुल वाजलेले असताना आता दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्र्रवादि काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीनीकरण होत असल्याच्या चर्चाना जोर आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही यावर भाष्य केल्याने त्या चर्चाना अजून जास्त उधाण आले. आता यावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे भाष्य

सुप्रिया सुळे यांनी आज (शनिवार, १३ जून) माध्यमांशी संवाद साधला यावेळी राष्ट्रवादीच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या कथित विलीनीकरणाच्या चर्चेबाबत त्या म्हणाल्या, “आमदार, खासदार किंवा अन्य कोणाशीही कोणीच संपर्क केलेला नाही, विलीनीकरणाची हि चर्चा कुठून झाली, याची कल्पना मला नाही. कोण कोणाच्या संपर्कात आहे, याची मला कल्पना नाही. शरद पवार यांच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही,” असे थेट भाष्य त्यांनी यावेळी केले.

काँग्रेसमध्ये होणार तृणमूल काँग्रेस विलीन?

तृणमूल काँग्रेस पक्षातील बंडखोरी आणि त्यानंतर काँग्रेसमधील त्यांच्या विलीनीकरणाच्या होणाऱ्या चर्चांबाबतहि त्यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, “काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाविषयी नेमकं काय सुरु आहे, याची मला कल्पना नाही. कारण तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची बैठक हि काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत झाली. या बैठकीत त्या दोघीच होत्या. त्यामुळे, त्यांनी माध्यमांना विलीनीकरणाविषयी काही सांगितलं आहे कि नाही, याची मला कल्पना नाही. विलीनीकरणाबाबत माझया काही वाचनात आलेले नाही,” असे त्या म्हणाल्या.

Maharashtra Politics: ‘काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज’; विरोधी पक्षांच्या विलीनीकरणावर मुख्यमत्र्यांचा घणाघात; म्हणाले, भाजपलाच…

सध्या देश वाचवण्याची गरज

देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता विलीनीकरण हा एक पर्याय असू शकतो का? असा प्रश्न मध्यमकर्मीनी विचारला असता त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “देशाची आर्थिक, राजकीय, सामाजिक परिस्थिती खूप वाईट का आहे? सध्या राजकारण करण्याची वेळ नाही. सध्या देश वाचवण्याची गरज आहे. महागाई, बेरोजगारी, प्रचंड भ्रष्टाचार, पेपरदुती यांसारखे प्रश्न गंभीर बनले आहेत. त्यामुळे एकमेकांशी भांडण करत बसायचे कि हे प्रश्न सोडवायचे याचा विचार करणे गरजेचे आहे,” असे त्या यावेळी म्हणाल्या.

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस (SP) चे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याबाबतच्या चर्चांनीही पक्षाच्या २७ व्या स्थापना दिनाच्या सुमारास जोर धरला होता. काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी असा दावा केला की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच मांडण्यात आला होता; या विधानानंतर या चर्चेने अधिक जोर धरला.

आमदार नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, “शरद पवार यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव पाठवला होता, परंतु काही कारणांमुळे त्यावर पुढे कोणतीही प्रगती होऊ शकली नाही. देशभरातील समान विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तृणमूल काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) देखील या दिशेने विचार करत आहेत.” मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हे दावे फेटाळून लावले.

भाजपा मित्रपक्ष गिळणारी ‘चेटकीण’, फडणवीसांच्या ‘काँग्रेस बुडते जहाज’ टीकेवर काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर

Web Title: Supriya sule reacts on ncp sharad pawar merge with congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • Congress
  • NCP Sharad Pawar
  • supriya sule

संबंधित बातम्या

मुलींवर अत्याचार व लाठीचार्ज करण्यापर्यंत पोलीसांची मजल, देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र…; सपकाळांचा हल्लाबोल
1

मुलींवर अत्याचार व लाठीचार्ज करण्यापर्यंत पोलीसांची मजल, देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र…; सपकाळांचा हल्लाबोल

राहुल गांधींच्या घराबाहेर वातावरण पुन्हा तापलं; पोलिसांनी रोखली खासदारांची बस अन्… पहा व्हिडियो
2

राहुल गांधींच्या घराबाहेर वातावरण पुन्हा तापलं; पोलिसांनी रोखली खासदारांची बस अन्… पहा व्हिडियो

Wardha : भरपावसात गांधीगिरी ! पेपरफुटीवर काँग्रेसची आक्रमक भूमिका…
3

Wardha : भरपावसात गांधीगिरी ! पेपरफुटीवर काँग्रेसची आक्रमक भूमिका…

NEET Paper Leak Reaction: ‘नीट’वरून काँग्रेस रस्त्यावर, तर राहुल गांधीविरुद्ध भाजप आक्रमक; संभाजीनगरमध्ये फुल हायव्होल्टेज ड्रामा
4

NEET Paper Leak Reaction: ‘नीट’वरून काँग्रेस रस्त्यावर, तर राहुल गांधीविरुद्ध भाजप आक्रमक; संभाजीनगरमध्ये फुल हायव्होल्टेज ड्रामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.