अजित पवार, एकनाथ शिंदे, भाजपकडे पक्ष प्रवेशाची मोठी यादी; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. नागपुरच्या राजभवनात शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे राज्याचं लक्ष लागलं असताना राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांना आणि मोठ्या नेत्या शपथविधीसाठी अद्याप फोन आलेला नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचं नाव उद्याप आलेलं नाही. त्यामुळे ते नागपूरमधील रेडिसिन ब्ल्यू हॉटेलमध्ये थांबले आहेत. सुनील तटकरे अजित पवार यांच्या स्वागतासाठी गेले असले तरी, भुजबळ मात्र अजूनही हॉटेलमध्येच थांबून आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आतापर्यंत ७ मंत्र्यांची नावं जाहीर करण्यात आली आहे. त्यात धनंज मुंडे धनंजय मुंडे यांचंही नाव नव्हतं. मात्र ऐनवेळी धनंजय मुंडे यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. तर छगन भुजबळ यांना अद्याप फोन गेलेला नाही, त्यामुळे त्यांना टच्चू दिल्याचं बोललं जात आहे. तर दिलीप वळसे,धर्मराव अत्राम,अनिल पाटील यांनांही मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. अजित पवारांनीही दोन नावांवर बोलण्यास नकार दिला. मंत्री ठरवायचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे, असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. शिंदे सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळणार की नाही याची उत्सुकता आहे.
१. धनंजय मुंडे
२. हसन मुश्रीफ
३. नरहरी झिरवाळ
४. आदिती तटकरे
५. बाबासाहेब पाटील
६. दत्तमामा भरणे
७. मकरंद पाटील
८. इंद्रनील नाईक
9. माणिकराव कोकाटे
1. चंद्रशेखर बावनकुळे
२. आशिष शेलार
३. राधाकृष्ण विखे पाटील
४. पंकजा मुंडे
५. गिरीश महाजन
६. नितेश राणे
७. शिवेंद्रराजे भोसले
८. चंद्रकांत पाटील
९. पंकज भोयर
१०. मंगलप्रभात लोढा
११. जयकुमार रावल
१२. गणेश नाईक
१३. मेघना बोर्डीकर
१४. अतुल सावे
१५. जयकुमार गोरे
१६. माधुरी मिसाळ
१७. संजय सावकारे
१८. अशोक उईके
१९. आकाश फुंडकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या राजभवनात दुपारी तीननंतर शपथविधी होणार असून राजभवनाच्या प्रशस्त लॉनवर जोरदार तयारी सुरू आहे. 1991 मध्ये शिवसेनेतल्या फुटीनंतर नागपुरात शपथविधी झाला होता. त्यानंतर 33 वर्षांनी मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरात होत आहे.