Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thackeray Brothers: महाराष्ट्र पेटणार! विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार; २६ जुलैला मुंबईत ‘संयुक्त मोर्च’

Thackeray Brothers Joint Protest: विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले आहेत. २६ जुलैला मुंबईत संयुक्त मोर्चा निघणार असून २४ जुलैला शिवाजी पार्कवर राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 22, 2026 | 09:54 PM
महाराष्ट्र पेटणार! विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार (Photo Credit- X)

महाराष्ट्र पेटणार! विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र पेटणार!
  • विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार
  • २६ जुलैला मुंबईत ‘संयुक्त मोर्चा’
मुंबई: दिल्लीतील जंतर-मंतरवर ‘सीजेपी’च्या (CJP) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता महाराष्ट्रात मोठा राजकीय पाठिंबा मिळाला आहे. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेला लाठीमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या मौनाविरोधात आता राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) थेट रस्त्यावर उतरणार आहेत. मराठी भाषेच्या अस्मितेनंतर आता विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असून २६ जुलै रोजी मुंबईत भव्य संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

२६ जुलैला मुंबईत धडकणार संयुक्त मोर्चा

दिल्लीत विद्यार्थ्यांना दिलेल्या अयोग्य वागणुकीविरोधात आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संयुक्त मोर्चाची रणनीती आणि आराखडा स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरे उद्या सकाळी विशेष पत्रकार परिषद घेणार आहे. याआधी मराठी भाषेच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले होते. आता थेट देशातील तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा खांद्याला खांदा लावून एकत्र येणार असल्याने या संयुक्त मोर्चाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

आदित्य ठाकरे आक्रमक

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तरुणांना आक्रमक होण्याचे आवाहन केले आहे. “तुमचं सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली. दिल्ली पोलिसांच्या लाठीमारावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबई पोलिसांमध्ये अजूनही संवेदनशीलपणा शिल्लक आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांसारखा विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला नाही.”

Rahul Narwekar: ‘उद्धव ठाकरे नेहमी चुकीचेच व्यासपीठ निवडतात’; राहुल नार्वेकर यांचा थेट टोला, तर काँग्रेसवरही जोरदार निशाणा

२४ जुलैला शिवाजी पार्कवर तिरंग्याखाली एकत्र येण्याचे आवाहन

आदित्य ठाकरे यांनी तरुणांना आणि नागरिकांना २४ जुलै रोजी चार वाजता शिवाजी पार्क येथे एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “कुठल्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली नाही, तर केवळ भारताच्या तिरंग्याखाली एकत्र येऊन सामूहिक राष्ट्रगीत गाऊया आणि विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा देऊया,” असे आवाहन त्यांनी केले.

🚨 वन नेशन, वन इमोशन! 🚨 २४ जुलै, शुक्रवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आमच्यासोबत सामील व्हा! दुपारी ४ वाजल्यापासून आपण सर्वजण तिरंग्याखाली एकत्र येऊया आणि सायंकाळी ५ वाजता आपले राष्ट्रगीत गाऊया. दिल्लीतील अमानुष दडपशाही आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या अटकेच्या… — Aaditya Thackeray (@AUThackeray) July 22, 2026

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अण्णा हजारेंची एन्ट्री

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी विद्यार्थ्यांच्या या लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून ते स्वतः मैदानात उतरले आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अण्णा हजारे गुरुवारी ‘मौन आंदोलन’ करणार असून त्यांनी केंद्र सरकारकडे विद्यार्थ्यांशी तात्काळ संवाद साधण्याची मागणी केली आहे.

अहिल्यानगरच्या वाडिया पार्कमध्ये उभारणार ‘नगरचे जंतर-मंतर’

अण्णा हजारे यांनी जाहीर केलेल्या आंदोलनानुसार, गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत अहिल्यानगर येथील वाडिया पार्क परिसरातील महात्मा गांधी स्मारकासमोर ते मौन आंदोलनाला बसणार आहेत. विशेष म्हणजे, दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर आंदोलनाची आठवण म्हणून अण्णा हजारे जिथे आंदोलन करणार आहेत, त्या जागेला प्रतिकात्मक “नगरचे जंतर-मंतर” असे नाव देण्यात येणार आहे. अण्णांच्या या अचानक झालेल्या एंट्रीमुळे केंद्र सरकारवरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

‘विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज अमान्य, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या’; ठाकरे-केजरीवाल यांचा जंतर-मंतरवरील आंदोलनाला पूर्ण पाठिंबा

Web Title: Thackeray brothers to take to the streets for students future joint morcha in mumbai on july 26

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 09:51 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Dharmendra Pradhan
  • Mumbai
  • neet paper leak
  • Protest
  • Raj Thackeary
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
1

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Satara News : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर; साताऱ्यात मूक मोर्चा, मुंबईत आंदोलनाचा इशारा
2

Satara News : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर; साताऱ्यात मूक मोर्चा, मुंबईत आंदोलनाचा इशारा

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
3

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
4

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.