Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Sena Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला फक्त 3 खासदार उपस्थित; 6 बंडखोरांनी फिरवली पाठ

Shiv Sena Operation Tiger: दिल्लीतून मोठी राजकीय घडामोड समोर आली असून ठाकरे गटातील बंडखोर सहा खासदारांनी पक्षाचा व्हीप धुडकावून लावत खासदारांच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. बैठकीला एकाही बंडखोर खासदाराने हजेरी न लावल्याने ठाकरे गटातील फूट अधिकृतपणे स्पष्ट झाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 18, 2026 | 11:48 AM
'ऑपरेशन टायगर' यशस्वी ठरलं? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला फक्त 3 खासदार उपस्थित; 6 बंडखोरांनी फिरवली पाठ

'ऑपरेशन टायगर' यशस्वी ठरलं? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला फक्त 3 खासदार उपस्थित; 6 बंडखोरांनी फिरवली पाठ

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीत ठाकरे गटाला मोठा धक्का
  • बंडखोर सहा खासदारांनी व्हीप धुडकावला?
  • उद्धव ठाकरेंच्या बैठकीला फक्त 3 खासदार उपस्थित
Shiv Sena Operation Tiger: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज (18 जून 2026 ) आपल्या खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. याचदरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात संभाव्य फूट पडण्याच्या चर्चांदरम्यान गुरुवारी बोलावण्यात आलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीची माहिती सर्व खासदारांना देण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत केवळ तीन लोकसभा खासदारच बैठकीला उपस्थित राहिले असून त्यांच्यातच बैठक सुरू आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार, लोकसभेतील दोन-तृतीयांश म्हणजेच सहा खासदारांचा पाठिंबा बंडखोर गटाला मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकंदरीत  एकनाथ शिंदे यांचं ऑफरेशन टायगर यशस्वी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

६ खासदार गेले, आता १६ आमदारांची बारी? एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर …

पक्षात पुन्हा एकदा फूट पडण्याच्या चर्चांना उधाण आले असून, बंडखोर खासदारांचा एक गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. ही बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा एक दिवसापूर्वी बंडखोर गटाने लोकसभेतील पक्षाच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे.

२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे गटाने आपल्या सर्व नऊ खासदारांना दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी पक्षाने ‘थ्री-लाइन व्हीप’ जारी करत सर्व खासदारांना वैयक्तिकरित्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीला कोणते खासदार उपस्थित राहतात आणि कोण गैरहजर राहतात, यावरून नेमके किती खासदार बंडखोर गटात आहेत, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

बैठकीला गैरहजर राहिल्यास अपात्रतेची कारवाई

संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, काही काळ खासदारांची वाट पाहिली जाईल. त्यानंतर तात्काळ कारवाई सुरू करण्यात येईल. त्यांनी महायुतीवर हल्लाबोल करत आरोप केला की, शिवसेना (UBT)च्या खासदारांचे ‘हायजॅकिंग’ केले जात आहे. पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, संसदीय मंडळाच्या बैठकीला सहा खासदार उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांच्याविरोधात अपात्रतेची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते.

लोकशाहीची थट्टा सुरू आहे का?

नाराजी व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले, “लोकशाहीचा हा खेळ लावला आहे का? देशाची प्रतिष्ठा, नियम आणि संविधानाशी खेळ सुरू आहे. आम्ही मेहनत करून निवडून येतो आणि तुम्ही आमच्या खासदारांचे अपहरण करत आहात.”

पंतप्रधान मोदींनाही सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान परदेश दौऱ्यावर आहेत, पण देशात काय सुरू आहे तेही त्यांनी पाहावे.”

शिवसेना (यूबीटी) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पक्षात फूट पडण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आपल्या विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. राऊत म्हणाले की, शिवसेना एकदा तुटली आहे, पण आता पुन्हा तोडण्याचा प्रयत्न करातात. ते म्हणाले, “आमच्या वडिलांचे नाव बाळासाहेब ठाकरे आहे, आम्ही घाबरणार नाही.” राऊत यांनी इशारा दिला की, पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तुरुंगात जावे लागले तरी धडा शिकवला जाईल. ते म्हणाले की, शिवसेना ईडी आणि सीबीआयच्या धमक्यांना घाबरत नाही, कारण त्यांना यापूर्वी तुरुंगवास भोगावा लागला आहे.

Operation Tiger : ‘सहा खासदार शिंदे गटात येणार’; संजय गायकवाडांचा दावा …

Web Title: Thackeray shiv sena six rebel mps ignore whip skip delhi meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • Operation Tiger
  • Shiv Sena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले
1

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

Shiv Sena Split : पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आल्यामुळेच फूट पडली ; शिवसेनेच्या वतीने नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
2

Shiv Sena Split : पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आल्यामुळेच फूट पडली ; शिवसेनेच्या वतीने नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
3

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

कोरडा दुष्काळ तत्काळ जाहीर करा, शेतकरी मदतीसाठी शिवसेनेचा एल्गार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
4

कोरडा दुष्काळ तत्काळ जाहीर करा, शेतकरी मदतीसाठी शिवसेनेचा एल्गार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.