Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : राजकीय पक्षांचे चिन्हच झाले गायब; स्थानिक आघाड्यांच्या चिन्हावरच लागली मोहर

पक्षीय घोषणापत्रांपेक्षा उमेदवारांची वैयक्तिक प्रतिमा, स्थानिक पातळीवरील कामे, कुटुंबाची ओळख आणि त्यांचा परिसरातील प्रभाव अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 27, 2025 | 02:51 PM
निवडणुकीची मतमोजणी आज होणार; राज्यातील जनतेचे लक्ष

निवडणुकीची मतमोजणी आज होणार; राज्यातील जनतेचे लक्ष

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर / दीपक घाटगे : कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक ठिकाणी गोटबाजी, स्थानिक घराणेशाही आणि वैयक्तिक संबंधांवर आधारित आघाड्या उभ्या राहत असून या सर्वांमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे पक्षांची अधिकृत चिन्हे जवळजवळ गायब झाली आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये प्रमुख पक्षांचे झेंडे, गाणी, प्रचार साहित्य आणि प्रतीके गाजत असतात; मात्र, स्थानिक निवडणुकीत हीच पक्षनिष्ठा पातळ होऊन पूर्णपणे स्थानिक आघाड्यांच्या रंगाने रंगलेली दिसत आहे.

या निवडणुकीत मोठ्या पक्षांच्या नेतृत्वांनी गाठीभेटी, समन्वयक बैठकांचा कितीही आग्रह धरला. तरी उमेदवार मात्र आपल्या गावातील समीकरण पाहूनच निर्णय घेताना दिसत आहेत. मागील काही दिवसांत जिल्ह्यातील बहुतेक नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. कुठे दोन गट एकत्र आले तर कुठे तीन गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस या पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते एकाच पॅनेलमध्ये एकत्र आले आहेत, तर काही ठिकाणी त्याच पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध जोरदार टक्कर देताना दिसत आहेत.

हेदेखील वाचा : ‘2014 मध्ये काँग्रेसचा झालेला पराभव नियोजित होता?’; माजी खासदार कुमार केतकर यांनी केले धक्कादायक आरोप

लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत कमळ, पंजा, धनुष्य-बाण, मोर, घड्याळ यांसारखी चिन्हे ठळकपणे झळकतात. मात्र, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत या चिन्हांना स्थान नसल्याने मतदारांना आता “सायकल”, “बाटली”, “दिवा”, “कुंडी”, “टेबल”, “खुर्ची” अशा विविध निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हांवर नजर ठेवावी लागली आहे. पक्षनिष्ठ मतदारांनाही आता “पक्ष नाही तर उमेदवार” असा विचार करावा लागत असून, चिन्ह न बदलता उमेदवार शोधण्याचे आव्हान मतदारांसमोर उभे ठाकले आहे.

वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये कार्यकर्ते सामील

जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी विकासकामे, पाणी योजना, रस्ते, ड्रेनेज, गटार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर या निवडणुकांची लढाई केंद्रीत झाली आहे. पक्षीय घोषणापत्रांपेक्षा उमेदवारांची वैयक्तिक प्रतिमा, स्थानिक पातळीवरील कामे, कुटुंबाची ओळख आणि त्यांचा परिसरातील प्रभाव अधिक महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे अनेक दशकांपासून एखाद्या पक्षाशी निष्ठा ठेवणारे कार्यकर्ते सुद्धा या वेळी वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये सामील झाले आहेत. काही ठिकाणी तर परंपरागत प्रतिस्पर्धी आता एकाच पॅनेलमध्ये उभे राहून “एकदिलाने सत्ता स्थापन” करण्याचे प्रयत्न करताना दिसतात. विचारधारेवर नव्हे, तर वैयक्तिक समीकरणांवर भर अधिक आहे.

पक्षांची चिन्हे नसल्याने वयोवृद्ध आणि ग्रामीण भागातील मतदार गोंधळले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याउलट तरुण मतदार आणि प्रथमच मतदान करणाऱ्या युवकांमध्ये या निवडणुकीबद्दल मोठी उत्सुकता दिसून येत आहे. ते पक्षापेक्षा उमेदवारांच्या कामगिरीला प्राधान्य देत असून, “कोण काम करणार?” हा मूलभूत प्रश्न विचारत आहेत. सोशल मीडियावरही प्रचाराला मोठे महत्त्व मिळत असून, व्हिडिओ, पोस्टर्स, पॅनेलची जाहिरात मोठ्या प्रमाणात फिरत आहे.

हेदेखील वाचा : Dharashiv News: धाराशिवमध्ये ८ नगरपरिषद निवडणुका: २८७ केंद्रांवर होणार मतदान, ३ डिसेंबरला निकाल

Web Title: The symbols of political parties have disappeared many party are now without their party symbol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • political party

संबंधित बातम्या

केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘राहुल गांधी विद्यार्थ्यांचा घेत आहेत गैरफायदा, केवळ राग…’
1

केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘राहुल गांधी विद्यार्थ्यांचा घेत आहेत गैरफायदा, केवळ राग…’

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली
2

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली

महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी; शिवसेना आणि राष्ट्रवादी ‘या’ मुद्यावरून आमनेसामने
3

महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी; शिवसेना आणि राष्ट्रवादी ‘या’ मुद्यावरून आमनेसामने

‘पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा’; उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला
4

‘पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा’; उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.