Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड महापालिकेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 29 नगरसेवक! भाजपचे 14 तर राष्ट्रवादीचे अन् शिवसेनेचे…

गंभीर गुन्ह्यांची नोंद असणारे २९ नगरसेवक पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात दिसणार आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी अशा उमेदवारांनाही मतदारांनी निवडून दिले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 24, 2026 | 12:51 PM
पिंपरी-चिंचवड महापालिकेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 29 नगरसेवक! भाजपचे 14 तर राष्ट्रवादीचे अन् शिवसेनेचे...

पिंपरी-चिंचवड महापालिकेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 29 नगरसेवक! भाजपचे 14 तर राष्ट्रवादीचे अन् शिवसेनेचे...

Follow Us
Close
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नगरसेवक
  • गंभीर गुन्ह्यांचा समावेश
  • भाजपमधील नगरसेवकतांची संख्या सर्वाधिक
पिंपरी : खून, खुनाचा प्रयत्न, दंगल, मारहाण, शासकीय कामात अडथळा, जमीन घोटाळा तसेच शस्त्र परवाना नियमांचे उल्लंघन अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असणारे २९ नगरसेवक पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात दिसणार आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी अशा उमेदवारांनाही मतदारांनी निवडून दिले आहे. ज्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त आणि गुन्हेगारी स्वरूपाची आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक १४, राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ तर शिवसेनेच्या २ नगरसेवकांचा समावेश आहे.

 

विशेष म्हणजे हे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांमधून (हलफनाम्यांतून) ही माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दंगल, मारहाण, छेडछाड,
फसवणूक, धनादेश न वटणे, लाचलुचपत, पत्नीवरील मानसिक व शारीरिक अत्याचार, शासकीय कामात अडथळा, जमीन घोटाळा तसेच शस्त्र परवाना नियमांचे उल्लंघन अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

या यादीत दोन महिला नगरसेविकांचाही समावेश आहे, ही बाब विशेष लक्षवेधी ठरते. यापैकी एका महिला नगरसेविकेवर तब्बल १० गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, सुमारे नऊ वर्षांनंतर झालेल्या या महापालिका निवडणुकीत एकूण ३४ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये भाजपचे १७, राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ आणि शिवसेनेचे ४ उमेदवार होते. यापैकी २९ उमेदवारांना यश मिळाले, तर उर्वरित उमेदवारांचा पराभव झाला.

निवडणूक आयोगाच्या स्पष्ट निर्देशानुसार, सर्व मतदान केंद्रांच्या बाहेर उमेदवारांची सविस्तर माहिती असलेले फलक लावण्यात आले होते. या फलकांवर उमेदवारांचे शिक्षण, उत्पन्नाचे स्रोत आणि त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती देण्यात आली होती. मतदारांनी ही माहिती पाहून स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला मतदान करावे, हा यामागचा उद्देश होता. मात्र प्रत्यक्ष निकाल पाहता, मतदारांनी बहुतांश ठिकाणी पक्षनिष्ठा आणि उमेदवाराची ओळख यालाच प्राधान्य दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ही पहिलीच वेळ नाही. सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीतही २६ नगरसेवकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघडकीस आली होती. त्यावेळीही खून, खुनाचा प्रयत्न आणि दंगलीसारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेले नगरसेवक सभागृहात पोहोचले होते. यंदाच्या निवडणुकीतही परिस्थिती फारशी वेगळी नसल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे स्वच्छ प्रतिमा आणि पारदर्शक कारभाराच्या घोषणा दिल्या जात असताना, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोकप्रतिनिधी सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम आगामी काळात महापालिकेच्या कामकाजावर आणि शहराच्या कारभारावर कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Web Title: There are 29 corporators with criminal backgrounds in pimpri chinchwad municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • crime news
  • Election News
  • PCMC News

संबंधित बातम्या

राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
1

राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

गुपचूप सुरु होता बालविवाह; पोलिसांना माहिती मिळताच टाकली धाड, अन् नंतर…
2

गुपचूप सुरु होता बालविवाह; पोलिसांना माहिती मिळताच टाकली धाड, अन् नंतर…

जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक; तब्बल पावणेदोन लाखांना घातला गंडा
3

जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक; तब्बल पावणेदोन लाखांना घातला गंडा

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार
4

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.