Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आत्मसन्मान मिळाला तर निश्चितच महायुती म्हणून विचार होईल’; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

महायुतीला घटक मानून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जागा वाटपाला आमचे प्राधान्य राहील. मात्र, तिन्ही घटक पक्षांनी शिवसेनेला सन्मानाची वागणूक द्यावी.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 16, 2026 | 02:40 PM
‘आत्मसन्मान मिळाला तर निश्चितच महायुती म्हणून विचार होईल’; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : महायुतीमधील घटक पक्षांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भाने शिवसेना शिंदे गटातील शिवसैनिकांचा सन्मान करावा. आत्मसन्मान मिळाला तर निश्चितच महायुती म्हणून विचार होईल. वाटाघाटी यशस्वी झाल्या तर एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊ मानसन्मान राखला तर ठीक. अन्यथा स्वबळावर लढू किंवा इतर चर्चेचे पर्याय आमच्यासाठी खुले आहेत, असे स्पष्ट संकेत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिले.

साताऱ्यात शिंदे गट शिवसेनेचा मेळावा नुकताच पार पाडला. या मेळाव्यात मार्गदर्शन केल्यानंतर शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावरआमदार महेश शिंदे, संजू राजे नाईक निंबाळकर, अनिकेत राजे नाईक निंबाळकर, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्र यादव, जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले, शिंदे गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुख रेश्मा जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra Politics : “हिंदी भाषा सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला” उबाठाच्या दुटप्पीपणावर उदय सामंत यांची सडकून टीका

देसाई पुढे म्हणाले, महायुतीला घटक मानून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जागा वाटपाला आमचे प्राधान्य राहील. मात्र, तिन्ही घटक पक्षांनी शिवसेनेला सन्मानाची वागणूक द्यावी. जागा वाटपात प्राधान्याने आमचा विचार व्हायला हवा वाटाघाटी यशस्वी झाल्या. तरच महायुती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. मानसन्मान राखला तर ठीक अन्यथा स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमचे चर्चेचे सर्व पर्याय खुले आहेत जो आमच्याशी समविचाराने चर्चा करेल, त्या बाबतीत नक्कीच राजकीय समीकरणांचा विचार केला जाईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.

Ahilyanagar News: ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या ‘या’ महत्वाच्या नेत्याला हृदयविकाराचा झटका!

…तर शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवणार

पालिका निवडणुकीप्रमाणे महायुती झाली नाही तर यावेळी स्वतंत्र निवडणूक शिवसेना लढवणार आहे. शिवसेना पूर्ण ताकतीने आपल्या पद्धतीने निवडणुकीत उतरेल. कराडमध्ये पालिका निवडणूक ज्या पद्धतीने लढवली त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या जातील. यावेळी कोणाचाही विचार करणार नाही. फलटण पालिकेत आमचे काही अंदाज चुकले. त्यामुळे आम्हाला अपयश आल्याचे त्यांनी मान्य केले. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाबरोबर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आपल्याला आला नसल्याची त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: To be treated with respect says shambhuraj desai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • Satara Politics
  • Shambhuraj Desai
  • shivsena

संबंधित बातम्या

Satara Election : महायुतीमधील घटक पक्षांकडून सन्मानाची वागणूक मिळावी, अन्यथा…; शंभूराज देसाईंचे स्पष्ट संकेत
1

Satara Election : महायुतीमधील घटक पक्षांकडून सन्मानाची वागणूक मिळावी, अन्यथा…; शंभूराज देसाईंचे स्पष्ट संकेत

Maharashtra Politics : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज; 27 जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी होणार प्रसिद्ध
2

Maharashtra Politics : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज; 27 जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी होणार प्रसिद्ध

विदर्भात मतदारांमध्ये दिसून आला निरुत्साह; सरासरी ५७.६२% झाले मतदान, आता प्रतिक्षा निकालाची…
3

विदर्भात मतदारांमध्ये दिसून आला निरुत्साह; सरासरी ५७.६२% झाले मतदान, आता प्रतिक्षा निकालाची…

राज्यात महापालिका निवडणुकीसाठीचे मतदान पूर्ण; आज जाहीर केले जाणार निकाल
4

राज्यात महापालिका निवडणुकीसाठीचे मतदान पूर्ण; आज जाहीर केले जाणार निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.