अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर खासदार उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया (फोटो - टीम नवराष्ट्र)
सातारा : राज्यामध्ये सध्या बदलापूर प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची चर्चा सुरु आहे. बदलापूरमध्ये शालेय विद्यार्थींनीवर केलेल्या अत्याचारामुळे त्याला अटक करण्यात आली होती. सर्व लोकांनी नराधमाला चौकामध्ये फाशी द्या अशी मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांच्या शिक्षेनंतर अक्षय शिंदेचा पोलिसांसोबतच्या चकमकीमध्ये एन्काऊंटर करण्यात आला. या प्रकरणावरुन आता विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे राजकारण सुरु आहे. या प्रकरणावर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना खासदार उदयनराजे भोसले यांनी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटवर प्रतिक्रिया दिली. आक्रमक प्रतिक्रिया देताना खूप सहज मरण दिले अशी कडक भूमिका देखील त्यांनी घेतली. खासदार उदयनराजे म्हणाले, सत्ताधारी विरोधक मला काही घेणदेणे नाही. सत्ताधारी असू दे किंवा विरोधक जे कोणी असू दे यांच्या कुटुंबासोबत हा प्रसंग घडला असता तर काय केले असते? बोलले असते का? अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे असतो. गोळ्या घालून लागते, त्या कुटुंबाच्या जागेवर मी स्वत:ला ठेवून मी बोलत मारणे हे अतिशय सहज झाले. अशा लोकांना जनतेत सोडले पाहिजे. जनतेने त्यांना तुडवून मारले पाहिजे, अशी आक्रमक प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
हे देखील वाचा : अक्षय शिंदेचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना ‘या’ पक्षाकडून बक्षीस जाहीर
उदयनराजे पुढे म्हणाले की, “मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की, त्या काळात जी न्यायव्यवस्था होती त्या प्रकारची न्यायव्यवस्था झाली पाहिजेत. त्यासाठी कायद्यात बदल करा. बलात्कर केला की सरळ लोकांसमोर त्याला फाशी द्या,” असे मत देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. तर दुसऱ्या बाजूला विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. सत्ताधार पक्षातील नेत्यांची नावं लपवण्यासाठी हा एन्काऊंटर केल्याचा गंभीर आरोप विरोधक करत आहेत. त्यामुळे अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावरुन जोरदार राजकारण सुरु आहे.