Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाफ्याच्या फुलाने राजकीय ‘गुलदस्ता’; उदयनराजे-रामराजेंच्या भेटीने जिल्हा बँक सभेला रंग

सभेच्या ठिकाणी उदयनराजे आणि रामराजे यांची लिफ्टमधून एकत्रित एन्ट्री झाली. व्यासपीठावर आल्यानंतर उदयनराजे यांनी जवळील चाफ्याचे फुल रामराजे यांना देत संवाद साधला. त्यानंतर दोघेही शेजारी बसले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 30, 2026 | 10:06 AM
चाफ्याच्या फुलाने राजकीय ‘गुलदस्ता’; उदयनराजे-रामराजेंच्या भेटीने जिल्हा बँक सभेला रंग

चाफ्याच्या फुलाने राजकीय ‘गुलदस्ता’; उदयनराजे-रामराजेंच्या भेटीने जिल्हा बँक सभेला रंग

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या आर्थिक विषयांपेक्षा राजकीय संकेतांमुळे अधिक चर्चेत आली. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची एकत्रित उपस्थिती आणि त्यांच्यातील दिलखुलास संवादाने सभागृहातील राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले.

सभेच्या ठिकाणी उदयनराजे आणि रामराजे यांची लिफ्टमधून एकत्रित एन्ट्री झाली. व्यासपीठावर आल्यानंतर उदयनराजे यांनी जवळील चाफ्याचे फुल रामराजे यांना देत संवाद साधला. त्यानंतर दोघेही शेजारी बसले. सभेच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत दोघांमध्ये अधूनमधून हास्यविनोद आणि चर्चा सुरू असल्याने उपस्थितांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.
जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. विशेष म्हणजे, रामराजे यांनी आपल्या भाषणात उदयनराजेंचा उल्लेख करत मिश्कील टिप्पणी केली.

Maratha Reservation : ‘मुंबईच नाही, दिल्लीही हलवू शकतो’; जरांगेंचा सरकारला इशारा, 12 तारखेला मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करणार

बँकेचे सरव्यवस्थापक सरकाळे यांनी खासदार उदयनराजे यांच्याकडून बँकेला कोणताही त्रास नसल्याचे सांगितल्याचा संदर्भ देत रामराजे म्हणाले, “त्यांचा बँकेला त्रास नसला तरी ते नुसते दिसले तरी त्रास होतो.” त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात हास्याची लहर उमटली.

दरम्यान, आगामी जिल्हा बँक निवडणुकीबाबत रामराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मला भीती नाही,” असे सांगत त्यांनी बँक ही देशातील ‘ब्रँड बँक’ असल्याचे नमूद केले. निवडणुकीच्या काळात सभासदांची पळवापळवी होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

काही सभासदांनी विद्यमान संचालक मंडळ कायम राहावे, अशी इच्छा व्यक्त केल्याचेही रामराजे यांनी सांगितले. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या या सभेत उदयनराजे-रामराजे यांच्यातील संवादाने अनेक राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. बँकेची सभा एक; पण चर्चेचा विषय मात्र उदयनराजे आणि रामराजे यांची ‘जोडी’ ठरल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले.

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?

Web Title: Udayanraje ramraje met together know satara politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • political news
  • Ramraje Naik Nimbalkar
  • Satara Politics
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

अकोल्यातील हिवरखेड नगर परिषदेच्या मासिक सभेत राडा; नगरसेवकासह काही जण जखमी
1

अकोल्यातील हिवरखेड नगर परिषदेच्या मासिक सभेत राडा; नगरसेवकासह काही जण जखमी

Satara Politics: उदयनराजेंवरील फेसबुक कमेंट्सने संताप; सातारा शहर पोलिसांत तक्रार
2

Satara Politics: उदयनराजेंवरील फेसबुक कमेंट्सने संताप; सातारा शहर पोलिसांत तक्रार

Shashikant Shinde Satara: मुंबईपासून पुण्यापर्यंत कोणी कुठले गुंड आणले हे माहीत आहे! जावळीच्या राजकारणावर शशिकांत शिंदे आक्रमक
3

Shashikant Shinde Satara: मुंबईपासून पुण्यापर्यंत कोणी कुठले गुंड आणले हे माहीत आहे! जावळीच्या राजकारणावर शशिकांत शिंदे आक्रमक

Government Decision : मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; ‘त्या’ 314 नियुक्त्याच केल्या रद्द
4

Government Decision : मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; ‘त्या’ 314 नियुक्त्याच केल्या रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.