Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, वाशिममधून ‘या’ शिवसैनिकाला मिळणार खासदारकीची उमेदवारी

ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. वाशिममधील सभेत त्यांनी संजय देशमुख यांच्यावर निशाणा साधत शिवसैनिकांना गद्दार खासदारांना जाब विचारण्याचे आवाहन केले, तसेच डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले.

  • By विवेक
Updated On: Jun 27, 2026 | 05:57 PM
उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, वाशिममधून 'या' शिवसैनिकाला मिळणार खासदारकीची उमेदवारी

उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, वाशिममधून 'या' शिवसैनिकाला मिळणार खासदारकीची उमेदवारी

Follow Us
Follow Us:

राज्यातील ‘ऑपरेशन टायगर’नंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला असून सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. ईशान्य मुंबईनंतर आज त्यांनी वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. याच सभेत त्यांनी वाशिम विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. सिद्धार्थ देवळे यांना तयारीला लागण्याचे आवाहन करत त्यांच्या संभाव्य उमेदवारीचे संकेत दिले.

‘गद्दार जिथे दिसेल तिथे जाब विचारा’, शिवसैनिकांना आवाहन

सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी दौऱ्यावर निघालो आणि काहींनी शिवसेना संपल्याची चर्चा सुरू केली. पण कडवट शिवसैनिक आजही आमच्यासोबत आहेत. तुम्ही निवडून दिलेल्या खासदारांनी गद्दारी केली आहे. त्यामुळे गद्दारांना थारा देऊ नका.”

ते पुढे म्हणाले, “तुमचा खासदार जिथे दिसेल तिथे त्याला जाब विचारा. गद्दारी का केली, याचे उत्तर मागा. पुढील तीन वर्षे हा कार्यक्रम सातत्याने सुरू ठेवावा.”

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा

भाजपच्या हिंदुत्वावरही उद्धव ठाकरेंची टीका

उद्धव ठाकरे यांनी भाजपवरही निशाणा साधत, “भाजपचं हिंदुत्व हे भोंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व म्हणजे हाताला काम आणि शेतकऱ्याला योग्य दाम देणारं हिंदुत्व आहे,” असे म्हटले.

राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी टीका करत, “राम मंदिराच्या नावावर जनतेची फसवणूक झाली आहे. ही गद्दारी फक्त माझ्याशी नाही, तर हिंदुत्वाशी झाली आहे,” असा आरोप केला.

शेतकरी कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्तीची मागणी

वाशिम-यवतमाळ भागातील शेतकरी आत्महत्यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, “शेतकरी गुन्हेगार नाही. त्यामुळे त्यांना कर्जमाफी नव्हे, तर कायमस्वरूपी कर्जमुक्ती मिळाली पाहिजे.”

‘गद्दार खासदार जिथे सापडतील तिथेच..’; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश, भाजपवरही घणाघात

सिद्धार्थ देवळेंना तयारीचे आदेश

सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी डॉ. सिद्धार्थ देवळे यांना उद्देशून, “आतापासूनच तयारीला लागा. पुढील तीन वर्षे तुमच्या हातात आहेत,” असे सांगितले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वाशिम मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

संजय राठोड यांचे प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या टीकेला मंत्री संजय राठोड यांनी प्रत्युत्तर दिले. “जो गरजते हैं, वो बरसते नहीं. आम्ही टीकेला उत्तर देणार नाही, कामातूनच उत्तर देऊ. ४० आमदारांपासून सुरुवात करून आज आमची संख्या ६० वर पोहोचली आहे. आगामी काळात आणखी अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करतील,” असा दावा त्यांनी केला.

Web Title: Uddhav thackeray washim tour targets rebel mp sanjay deshmukh siddharth devale candidature hint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray
  • Washim

संबंधित बातम्या

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
1

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
2

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
3

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
4

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.