Photo Credit-Social Media राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामासंदर्भात अपडेट
सिंधुदुर्ग: मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीच्या कामाने गती घेतली आहे. या पुतळ्यासाठी आवश्यक असलेल्या चबूतऱ्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.गुरुवारी, उत्तर प्रदेशातील नोएडा येथून या पुतळ्याच्या उभारणीसाठी आवश्यक साहित्य मोठ्या ट्रकद्वारे मालवणात पोहोचले. विशेषतः, शिवपुतळ्याच्या खडकरूपी बेसचे ३० बाय ३० फूट लांबीचे भाग येथे दाखल झाले आहेत.या ऐतिहासिक प्रकल्पामुळे मालवणमधील पर्यटक आकर्षित होणार असून, स्थानिक आणि पर्यटकांसाठी नव्या प्रेरणादायी स्थळाची निर्मिती होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी उभारण्यात आलेला शिवरायांचा हा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी जवळपास २ वाजताच्या सुमारास कोसळला. ३६०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून दुसरीकडे विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं आहे.
परळीत कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर पोलिसांची कारवाई; तब्बल 82 हजारांचा दंड वसूल
राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 35 फूटांचा होता. मालवणमधील तारकर्ली येथील समुद्र किनाऱ्यावर नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतीय नौदलानेही आपल्या ध्वजावर शिवरायांचा शाही शिक्का छापला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय नौदलछायाच्या वतीने घेण्यात आला. याचनिमित्ताने राजकोट किल्ल्यावार नौदल आणि महाराष्ट्र सरकारने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले.
Parents worship day : माता-पिता पूजन दिवस साजरा करण्याचा मूळ उद्देश्य म्हणजे भारतीय
शिवरायांचा पुतळा कोसळ्यानंर शिवाजी महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे पडला. याचे आम्हाला दु:ख झाले असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. या पुतळ्यासाठी सहा महिनाभरापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करुन पुतळा उभारण्यात आला होता. जेव्हा-जेव्हा काम सुरू होते, तेव्हा स्थानिकांनीही या कामाबद्दल तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यावेळी त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करण्यात आले. जे विरोध करत आहे करत आहेत ते आपल्या विरोधात आहे असा समज करुन घेतला. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील कम ढासळले होते. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल. तसेच सर्व शिवप्रेमींनी शांततेत आंदोलन करावे.