File Photo : Police Action
परळी वैजनाथ : जिल्हा वाहतूक शाखा व परळी शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरातील कर्णकर्कश सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे वाहनचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी जवळपास 135 वाहनांवर कारवाई केली. यात 11 बुलेटचे सायलेन्सर काढणे, दादा, भाऊ, काका, आण्णा अशा फॅन्सी नंबरप्लेट लावल्याबद्दल वाहनांवर तर वाहन परवाना नसल्याबद्दल वाहनांवर कारवाई केली. बुधवार व गुरुवार या दोन दिवसांच्या मोहिमेत वाहनचकांवर ८२ हजारची दंडात्मक कारवाई करण्यात आल्या.
परळी शहरातील धूम स्टाईल वाहने चालवणाऱ्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वारंवार नागरिकांनी मागणी करूनही पोलीस कुठलीही कारवाई या वाहनचालकांवर करत नसल्याचा आरोप परळीकर करत होते. मात्र, अचानक १२ फेब्रुवारीपासून जिल्हा वाहतूक शाखा व परळी शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राणी लक्ष्मीबाई टॉवर, उड्डाण पुलावर वाहतूक पोलिस पथकाने कारवाई सुरू करत कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट, वाहन परवाना तपासणी चालू केली.
चौकात कधीही न दिसणारे पोलीस अचानक अवतरल्याने वाहनचालक अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडले. शहरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून पोलिसाने अडवणे व चौकशी करणे याची सवय नसल्याने वाहनचालक व पोलिसांत वादविवाद या कारवाई दरम्यान होत होते. मात्र, पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने अनेक वाहनचालकांनी निमूटपणे दंड देत आपली सुटका करून घेतली.
पिस्तूलप्रकरणी एकाला अटक
देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी कर्वेनगर भागातून अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक रंगराव पवार, पोलीस निरीक्षक नीलेश बडाख व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. कुणाल सचिन घावरे (वय २८, रा. बराटे काॅलनी, कर्वेनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.