Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असं वाटतं का? अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचा प्रकाश आंबेडकरांनी घेतला समाचार

राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी देण्यावर राजकारण रंगले आहे. याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी समाचार घेतला.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 02, 2025 | 03:47 PM
Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar criticized Ajit Pawar over farmer loan waiver

Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar criticized Ajit Pawar over farmer loan waiver

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या पूर्ण कर्जमाफीसाठी आक्रमक मोर्चा आणि आंदोलन केले. याचबरोबर त्यांनी रेल रोकोचा देखील इशारा दिला. यानंतर आता शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. मात्र यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सारखंच फुकटात कसं मिळेल असे वक्तव्य केले होते. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडिया पोस्ट करुन प्रकाश आंबेडक यांनी अर्थमंत्री अजित पवारांना शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असं वाटतं का? असा प्रश्न केला आहे.

काय आहे प्रकाश आंबेडकर यांची पोस्ट?

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन अजित पवारांवर रोष व्यक्त केला. प्रकाश आंबेडकर यांनी लिहिले आहे की, अजित पवार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का तुम्हाला? अजित पवारजी, तुम्ही म्हणालात, “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” पण खरा प्रश्न असा आहे की, तुम्ही आणि तुमचे सरकार शेतकऱ्यांचे हक्क किती काळ नाकारत राहणार? कधीपर्यंत हजारो कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर्ज माफ केले जाईल आणि शेतकऱ्यांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

प्रकाश आंबेडकर यांनी पुढे लिहिले की, महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान आणि शेतमालाला भावाच्या अभावामुळे अडचणीत आहेत. हे शेतकरी कठोर परिश्रमाने अन्न पिकवतात परंतु, तुमचे सरकार त्यांच्या कष्टाची परतफेडही करू शकत नाही! शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णपणे रास्त आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी कोणताही मुद्दा नवीन नाही. निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध झालेल्या भाजपच्या जाहीरनाम्यात या समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, वास्तव असे आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुम्ही तिघांनी मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल ५,३२८ रुपये जाहीर करण्यात आली आहे पण, शेतकऱ्यांना फक्त ३,५०० ते ४,००० रुपये भाव मिळत आहेत! म्हणजे जवळजवळ ३० टक्के कमी! कापसाची स्थितीही तितकीच भयानक आहे. अवकाळी पावसाने राज्यातील २९ जिल्ह्यांना उद्ध्वस्त केले आहे. ६८ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. सरकारने मदत जाहीर केली पण, जमिनीवर असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत एक पैसाही पोहोचला नाही! शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात घालवली आणि आता त्यांच्या आशाही पावसात वाहून गेल्या आहेत. तुमच्या सरकारला शांत झोप मिळावी, म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे तुम्हाला वाटते का? शेतकऱ्यांना भिक नको आहे, त्यांना त्यांचे हक्क हवे आहेत ! वंचित बहुजन आघाडी तुमच्या शेतकरीविरोधी विधानाचा तीव्र निषेध करते!! अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

अजित पवार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का तुम्हाला? अजित पवारजी, तुम्ही म्हणालात, “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” पण खरा प्रश्न असा आहे की, तुम्ही आणि तुमचे सरकार शेतकऱ्यांचे हक्क किती काळ नाकारत राहणार? कधीपर्यंत हजारो कोटी… — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) November 2, 2025

Web Title: Vanchit bahujan aghadi leader prakash ambedkar criticized ajit pawar over farmer loan waiver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • ajit pawar
  • maharashtra farmers
  • Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

बारामतीत नगराध्यक्षपदाचा राष्ट्रवादीचा संभाव्य उमेदवार कोण? ‘या’ नावाची जोरदार चर्चा
1

बारामतीत नगराध्यक्षपदाचा राष्ट्रवादीचा संभाव्य उमेदवार कोण? ‘या’ नावाची जोरदार चर्चा

पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला भगदाड! ‘हे’ बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार
2

पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला भगदाड! ‘हे’ बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Farmers News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कर्जमाफीची घोषणा
3

Farmers News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कर्जमाफीची घोषणा

Ajit Pawar on Chakankar : रुपाली चाकणकरांना व्हावे लागणार महिला आयोग अध्यक्षपदापासून पायउतार? अजित पवारांची ओढावली नाराजी
4

Ajit Pawar on Chakankar : रुपाली चाकणकरांना व्हावे लागणार महिला आयोग अध्यक्षपदापासून पायउतार? अजित पवारांची ओढावली नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.