Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘… तर त्याच अंदाजात प्रत्युत्तर देऊ’; भाजप नेत्याचा मनसेला इशारा! रिक्षा चालकांच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या निर्णयानंतर आरे कॉलनीत भाजप रिक्षा युनियनकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी अभिजीत राणे यांनी मनसेला थेट इशारा दिला.

  • By विवेक
Updated On: Aug 28, 2026 | 07:20 PM
भाजप नेत्याचा मनसेला इशारा! रिक्षा चालकांच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले

भाजप नेत्याचा मनसेला इशारा! रिक्षा चालकांच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले

Follow Us
Follow Us:
  • मराठी शिकण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना फडणवीसांकडून आणखी एक वर्षाची मुदतवाढ.
  • आरे कॉलनीत भाजप रिक्षा युनियनकडून ढोल-डीजे आणि गुलाल उधळून जल्लोष.
  • उत्तर भारतीय रिक्षा चालकांवर कारवाई केल्यास ‘अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन’ देण्याचा अभिजीत राणेंचा इशारा
 

महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आणि त्यासाठी प्रमाणपत्र सादर करण्याच्या नियमावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापले आहे. चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर आरटीओकडून कारवाईलाही सुरुवात झाली होती. मात्र, या कारवाईला काही परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी विरोध केला.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे संबंधित चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आरे कॉलनीत भाजप रिक्षा युनियनचा जल्लोष

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीमध्ये भाजप रिक्षा युनियनच्या वतीने जल्लोष करण्यात आला. ढोल-डीजेच्या तालावर गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

‘राहुल गांधींचे महाराष्ट्रातील रिलाँचिंग करण्याचा प्रयत्न थांबवा,’ बावनकुळेंचा काँग्रेसला टोला

यावेळी भाजप कामगार आघाडीचे अध्यक्ष अभिजीत राणे यांनी मनसेवर निशाणा साधत आक्रमक भूमिका घेतली. उत्तर भारतीय रिक्षा चालकांवर मनसेकडून कारवाई करण्यात आल्यास त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

‘अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन दिली जाईल’

अभिजीत राणे म्हणाले की, उत्तर भारतीय रिक्षा चालकांवर कोणतीही कारवाई केली तर त्याच अंदाजात आम्ही प्रत्युत्तर देऊ. त्यामुळे रिक्षा चालकांनी घाबरण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.

रिक्षा चालकांना मुदतवाढ दिल्यामुळे काही शिवसेना नेते आणि मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवरही राणे यांनी प्रतिक्रिया दिली. रिक्षा चालकांवर कारवाई होत होती, तेव्हा आम्ही नाराज होतो. आता ते नाराज आहेत, असे म्हणत त्यांनी या राजकीय वादावर भाष्य केले.

‘माझ्याकडे बघू नका बरं का भुजबळ साहेब…’; गिरीश महाजनांचा छगन भुजबळांना मिश्किल टोला

एक वर्षानंतर मुदतवाढ नाही

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ दिली असली तरी त्यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कालावधीत रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आवश्यक मराठी भाषा शिकणे अपेक्षित आहे.

मुदतवाढीच्या निर्णयामुळे सध्या रिक्षा चालकांना दिलासा मिळाला असला, तरी या मुद्द्यावरून मनसे, भाजप आणि सत्ताधारी गटातील नेत्यांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Auto taxi drivers marathi learning extension fadnavis abhijit rane mns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • BJP
  • MNS
  • pratap sarnaik
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस
1

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस

MNS Campaign Shivaji : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मनसेची शिवाजी पार्कावर ‘सेल्फी विथ ज्ञानू’ मोहीम सुरू
2

MNS Campaign Shivaji : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मनसेची शिवाजी पार्कावर ‘सेल्फी विथ ज्ञानू’ मोहीम सुरू

Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी
3

Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा
4

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.