Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपला मोठा धक्का? भाजप मंत्र्याच्या भावाचा होणार शिंदे गटात पक्षप्रवेश

सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याची माहिती आहे. 1 सप्टेंबर रोजी मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणार असून, या घडामोडीमुळे माण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 28, 2026 | 08:46 PM
राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; 'नशामुक्त महाराष्ट्र'साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुले चर्चाना उधाण

राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; 'नशामुक्त महाराष्ट्र'साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुले चर्चाना उधाण

Follow Us
Follow Us:
  • शेखर गोरे 1 सप्टेंबरला मुंबईत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती.
  • विधान परिषद निवडणुकीतील कथित आश्वासनावरून शेखर गोरे नाराज असल्याची चर्चा.
  • शेखर गोरे यांच्या प्रवेशामुळे माण तालुक्यात शिंदे गटाला बळ, भाजपला धक्का बसण्याची शक्यता
 

महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतरांचे सत्र सुरू असतानाच सातारा जिल्ह्यातून महायुतीतील अंतर्गत राजकारणाला नवा ट्विस्ट मिळण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा बँकेचे संचालक आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी मुंबईत शेखर गोरे यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे. या प्रवेशामुळे माण तालुक्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधान परिषद निवडणुकीतील आश्वासनावरून नाराजी?

शेखर गोरे यांच्या पक्षप्रवेशामागे गेल्या काही दिवसांपासूनची नाराजी कारणीभूत असल्याची चर्चा आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेखर गोरे यांना कथितपणे काही आश्वासन दिले होते. मात्र, ते पूर्ण झाले नसल्यामुळे ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

‘… तर त्याच अंदाजात प्रत्युत्तर देऊ’; भाजप नेत्याचा मनसेला इशारा! रिक्षा चालकांच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले

अखेर या नाराजीतून त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या प्रवेशामुळे माण तालुक्यात शिंदेसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता आहे.

महायुतीतील समीकरणांवर परिणाम?

विशेष म्हणजे, यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता शेखर गोरे यांच्या माध्यमातून शिंदे गटाने भाजपला धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शेखर गोरे हे मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू असल्याने या पक्षप्रवेशाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे हा केवळ स्थानिक पातळीवरील पक्षप्रवेश नसून महायुतीतील अंतर्गत राजकीय समीकरणांचा संदेश म्हणूनही त्याकडे पाहिले जात आहे.

‘राहुल गांधींचे महाराष्ट्रातील रिलाँचिंग करण्याचा प्रयत्न थांबवा,’ बावनकुळेंचा काँग्रेसला टोला

दरम्यान, शेखर गोरे यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर माण तालुक्यातील राजकारणात कोणते बदल होतात आणि भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Web Title: Shekhar gore eknath shinde shivsena bjp jaykumar gore satara politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Jaykumar Gore
  • shivsena

संबंधित बातम्या

Eknath Shinde Press Conference: ‘कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस’; एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका
1

Eknath Shinde Press Conference: ‘कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस’; एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत
2

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल
3

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!
4

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.