
खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांच्या जयंतीदिनी शिवसेनेवर होणार अंतिम निर्णय!
बुधवारी सुप्रीम कोर्टात जेव्हा या प्रकरणाच्या सुनावणीची वेळ आली, तेक्षा अतिम युक्तिवादासाठी ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलानी प्रत्येकी ५-५ तासाचा वेळ मागितला, दुसरीकडे, सॉलिसिटर जनरल दुसऱ्या एका प्रकरणात व्यस्त होते. त्यामुळे दोन्ही बाजूच्या संमतीने आता या प्रकरणावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या अंतिम खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोटांत बुधवारी जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणाची सुनावणी झाली नाही. या प्रकरणासाठी लवकरच नवीन तारीख दिली जाईल.
नागपूर, चंद्रपूर या महापालिकासह २० झेडपी आणि काही नगरपालिकामध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यानंतर आता पुढे काय कारवाई केली जाणार, हे या सुनावणीनंतर स्पष्ट होईल. राज्यातील उर्वरित २० जिला परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा आदेश येत नाही, तोपर्यंत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.
सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने उद्धव ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की, आमच्या संयमाची परीक्षा घेतली जात आहे. महाराष्ट्रातील सुमारे १३ कोटी जनता गेल्या २ वर्षांहून अधिक काळ या निकालाची वाट पाहत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी निकाल लागेल अशी आम्हाला आशा होती, पण तसे झाले नाही. शिंदे गटाने गद्दारी करून पक्ष आणि चिन्हावर कब्जा केला असून हे अत्यंत दुर्दैवी आहे. असा आरोपही त्यांनी केला.