Junnar Politics : जुन्नरमध्ये जिल्हा परिषद 8 जागांसाठी 50 तर पंचायत समितीच्या 16 गणांसाठी 90 अर्ज दाखल
जुन्नर : जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी 50 तर पंचायत समितीच्या 16 गणांसाठी 90 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, उमेदवारांची संख्या वाढल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचा, नाराज उमेदवारांची नाराजी दूर करुन उमेदवारांची उमेदवारी माघारी घेण्यासाठी मोठा कस लागणार आहे.
जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद ८ गट व पंचायत समिती १६ गण अशा एकूण २४ जागांसाठी १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील शेळके यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.
हेदेखील वाचा : Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेसाठीही पक्षप्रवेशाचा ट्रेंड सुरू ! शिरुरचे माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
दरम्यान, तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आळे पिंपळवंडी गटातून सर्वाधिक १० तर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उदापूर गणातून सर्वाधिक ९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
जिल्हा परिषद गटाकरिता उमेदवारी अर्जांची संख्या
उदापूर- पूर- डिंगोरे ६, ओतूर धालेवाडी ६, आळे पिंपळवंडी १०, राजुरी-बेल्हे ४, बोरी बुद्रुक खोडद ५, नारायणगाव- वारूळवाडी ५, सावरगाव-कुसुर ८, बारव-तांबे ६.
पंचायत समिती गणाकरिता उमेदवारी अर्जांची संख्या
उदापूर ९, डिंगोरे ५, ओतुर ६, धालेवाडीतर्फे हवेली ४, पिंपळवंडी ७, आळे ५, राजुरी ६, बेल्हे ५, बोरी बुद्रुक ६, खोडद ३, नारायणगाव ५, वारूळवाडी ५, सावरगाव ७, कुसूर ६, बारव ४, तांबे ७.
जिल्हा परिषदेच्या निमित्ताने पक्षप्रवेश सुरु
पुणे महापालिका पाठोपाठ आता जिल्हा परिषदेच्या निमित्ताने पक्षप्रवेश सुरु झाले आहे. शिरुरच्या माजी आमदारांसह त्यांच्या कुटुंबियांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जिल्हा परीषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यात वरचष्मा असून, त्यांनी जिल्हा परीषदेचा गड राखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. सोमवारी शरद बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ भाजपनेही पक्ष प्रवेश करून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने काही नाराजांना गळाला लावण्यात भाजप यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे.






