Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविकास आघाडीत ‘महाबिघाड’? काँग्रेसचा मुख्यमंत्री दावा उद्धव ठाकरे करणार का मान्य

मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसपेक्षा 10 जागा कमी लढण्याचा तयारी ठाकरे गटाकडून दाखवण्यात आली आहे. 2019 ला युतीमध्ये 125 जागांवर शिवसेना लढली होती. मात्र, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रि‍पदासाठी ठाकरे गटाकडून 95 जागांवर लढण्याची तयारी दाखवली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 20, 2024 | 04:42 PM
संभाजीनगरमधील 'या' बड्या नेत्याची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी; स्थानिक निवडणुकांपूर्वीच शिवसेनेला धक्का

संभाजीनगरमधील 'या' बड्या नेत्याची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी; स्थानिक निवडणुकांपूर्वीच शिवसेनेला धक्का

Follow Us
Close
Follow Us:

एकीकडे विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु असताना उद्धव ठाकरे मात्र, काहीसे अस्वस्थ आहेत. काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्वेमुळे ठाकरेंचं टेन्शन वाढलेलं दिसतंय. त्यामुळे त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. हा सर्वे खरा ठरल्यास उद्धव ठाकरेंपुढे कोणता पर्याय उरणार? हाही मोठा प्रश्न आहे.

खरंतर प्रदेश काँग्रेसने एक खाजगी सर्वे केला आहे. या सर्वेनुसार काँग्रेसला ८५ हून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर शरद पवार गटाला ५५ ते ६० आणि उबाठा गटाला केवळ २५ ते ३० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ असल्याचं दिसून येतंय.

मुख्यमंत्रीपदासाठी चाललेली उद्धव ठाकरेंची धडपड या सर्वेमुळे पार धुळीस मिळाल्याचं दिसतंय. थेट दिल्ली गाठून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याची मागणी केली. एवढंच नाही तर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली. परंतू, काँग्रेस आणि शरद पवार गटाने त्यांची ही मागणी परस्पर फेटाळून लावली आणि ज्याच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असं त्यांना सांगण्यात आलं.

या सगळ्यानंतर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार आहे, असं विधान केलं. एका मेळाव्यात बोलताना त्यांनी “मला १०० टक्के खात्री आहे की, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार. त्यासाठी आपण सर्वांनी चांगलं काम करा,” असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं.

त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढल्याचं दिसतंय. एकीकडे ज्याच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असं ठाकरेंना सांगण्यात आलं. तर दुसरीकडे, काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेमध्ये मात्र, उबाठा गटाला सर्वात कमी जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शिवाय बाळासाहेब थोरातांनी केलेलं वक्तव्यही ताजं आहेच. या सगळ्यामुळे उद्धव ठाकरेंची अवस्था केवीलवाणी झाली आहे.

Web Title: Will uddhav thackeray accept the claim of congress chief minister it looks like nothing is right in mva

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 04:42 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra legislative assembly elections 2024
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

“केवळ माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला असं म्हणून चालत नाही,” सभागृहातील उपस्थितीवरून भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
1

“केवळ माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला असं म्हणून चालत नाही,” सभागृहातील उपस्थितीवरून भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?
2

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?

रुपयाची घरसण होत असताना आता पंतप्रधानांची इज्जत घसरत नाही का? काँग्रेसचा संतप्त सवाल
3

रुपयाची घरसण होत असताना आता पंतप्रधानांची इज्जत घसरत नाही का? काँग्रेसचा संतप्त सवाल

काँग्रेसच्या सात हजार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर, विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार.
4

काँग्रेसच्या सात हजार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर, विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार.

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.