संग्रहित फोटो : काँग्रेस पक्ष
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर, हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रानंतर आता राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. याची घोषणाही झाली आहे. असे असताना आता काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये ‘आपले सरकार आल्यास, आपण बेरोजगार तरुणांना एक वर्षासाठी दर महिन्याला प्रशिक्षणार्थी म्हणून 8500 रुपये मदत म्हणून देऊ’, अशी घोषणा केली आहे.
हेदेखील वाचा : स्वबळावर लढण्याचा नारा देत ठाकरे गट पडला आघाडीतून बाहेर; खासदार सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राजधानी दिल्लीत ही घोषणा केली. तत्पूर्वी, दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख देवेंद्र यादव यांनी शनिवारीच सोशल मीडियाद्वारे, सचिन पायलट दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यालयात एक मोठी घोषणा करणार आहेत, अशी माहिती दिली होती. काँग्रेसने सर्वात पहिले महिलांसाठी सन्मान निधीची घोषणा केली होती. काँग्रेसने त्यांच्या तिसऱ्या गॅरंटीची घोषणा केली. ही घोषणा तरुणांसाठी असून, तिचे नाव ‘युवा उडान योजना’, असे आहे.
तसेच आपले सरकार आल्यास, आपण बेरोजगार तरुणांना एक वर्षासाठी दर महिन्याला प्रशिक्षणार्थी म्हणून 8500 रुपये मदत म्हणून देऊ, अशी घोषणा काँग्रेसने केली आहे. मोफत उपचारांची गॅरंटी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या गॅरंटीमध्ये मोफत उपचारांचा समावेश होता. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिल्लीत ही घोषणा केली. या हमीला जीवन रक्षा योजना, असे नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत, सर्व नागरिकांना 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच आमची ‘मनिषा’ दिल्लीतील लोकांची ‘सुरक्षा’, असेही काँग्रेसने म्हटले होते.
दरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी गेल्या आठवड्यात ही घोषणा केली होती. मोफत उपचारांची गॅरंटी काँग्रेसच्या दुसऱ्या गॅरंटीमध्ये मोफत उपचारांचा समावेश होता. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिल्लीत ही घोषणा केली. या हमीला जीवन रक्षा योजना, असे नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत, सर्व नागरिकांना 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : त्या दिवशी आम्ही कोणालाही सोडणार नाही…; बीड हत्या प्रकरणावरुन मुंडेंच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले