Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

Janmashtami 2026: नवरा-बायकोचं नातं प्रेमासोबतच विश्वास, संयम आणि परस्पर समजुतीवर टिकतं. अनेकदा गैरसमज, संशय किंवा छोट्या गोष्टींवरून होणारे वाद यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 01, 2026 | 04:45 PM
Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जन्माष्टमीला वैवाहिक सुखासाठी विशेष उपायांची मान्यता
  • प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणाला नात्यात महत्त्व
  • ज्योतिषीय उपाय हे श्रद्धेवर आधारित असल्याचे लक्षात घ्या
नवरा बायकोचं नातं हे एकदम नाजूक असतं. हे नातं फक्त प्रेमावर नाही तर विश्वासावर टिकतं. दोन वेगवेगळ्या घरातून आलेली दोन माणसं एकत्र येतात, त्यांचे विचार वेगळे असतात. त्यामुळे सुरुवातीला एकमेकांना समजायला वेळ लागतो. जर या काळात थोडा संयम नाही ठेवला तर छोट्या छोट्या गोष्टीवरून पण मोठं भांडण होतं. पण जर मनात खरं प्रेम असेल तर कितीही भांडण झालं तरी एकमेकांशिवाय करमत नाही.

बऱ्याच घरात सतत वाद होतात, एकमेकांवर संशय घेतला जातो. अशा वेळी घरातली शांतता निघून जाते. हे सगळं थांबवून नवरा बायकोत राधा-कृष्णासारखं निर्मळ प्रेम यावं यासाठी येत्या ४ सप्टेंबरला जन्माष्टमीचा दिवस खूप चांगला आहे. या दिवशी काही जुने उपाय केले तर नक्की फायदा होतो असं म्हटलं जातं. Janmashtami 2026:

१. घरातला दोष काढून टाका

कधी कधी घरात पितृदोष असतो, कुलदेवतेचा कोप असतो किंवा वास्तूमध्ये काही दोष असतो. त्यामुळे नवरा बायकोत विनाकारण भांडणं होतात. घरात नकारात्मकता येते. यासाठी पहिल्यांदा चांगल्या गुरुजींना विचारून पितृदोषाची शांती करून घ्या. आपल्या कुलदेवतेचं टाक असतं त्याची पूजा, कुलाचार वेळेवर करत जा. घरातला पसारा काढा, वास्तुदोष असेल तर तो पण काढून घ्या. घरातली नकारात्मक ऊर्जा गेली की आपोआप शांतता येते.

२. ग्रहांची शांती आणि पोथी वाचन

पत्रिकेत जर शनी, राहू किंवा मंगळाचा त्रास असेल तर पण नात्यात कटकटी येतात. अशा वेळी त्या ग्रहाचा जप, होम किंवा दान करावं. त्याचबरोबर घरात चांगली ऊर्जा येण्यासाठी ग्रंथ वाचणं खूप चांगलं असतं. रोज सकाळी ‘गुरुचरित्र’, ‘स्वामी समर्थ चरित्र’, ‘साई चरित्र’ यासारख्या पवित्र ग्रंथाचं थोडं तरी वाचन करा. याने मन शांत होतं आणि घरातलं वातावरण पण चांगलं राहतं.

३. भांडण घटस्फोटापर्यंत गेलं असेल तर हा उपाय करा

ज्या घरात भांडण खूप वाढलं आहे, घटस्फोटापर्यंत वेळ आली आहे, दोघांपैकी एकाला वेगळं व्हायचं आहे, अशा लोकांसाठी एक खास उपाय आहे. संत एकनाथ महाराजांनी लिहिलेली ‘रुक्मिणी स्वयंवर’ ही पोथी यासाठी खूप प्रभावी मानली जाते.

त्यासाठी आधी संकल्प करायचा.
संकल्प – मम वैवाहिक जीवन कर्माणि उत्पन्नांना विविध प्रत्यवायांना समूल परिहारपूर्वक पुनः मिलन सिद्धी द्वारा अद्यारंभ करिष्ये ।।हा संकल्प म्हणून मनापासून रुक्मिणी स्वयंवर पोथी वाचायला सुरुवात करा. एका दिवसात पूर्ण पोथी वाचणं शक्य नसेल तर रोज एक अध्याय तरी वाचा. श्रद्धेने वाचलं तर तुटलेलं नातं परत जुळतं असं जुने लोक सांगतात.

सोळा सोमवारचं व्रत

४. सोळा सोमवार करानवरा बायकोने दोघांनी मिळून किंवा दोघांपैकी एकाने सोळा सोमवारचं व्रत करावं. दर सोमवारी संध्याकाळी जवळच्या महादेवाच्या मंदिरात जावं. तिथे शंकराच्या पिंडीवर एक नारळ अर्पण करा, कणकेचा दिवा करून त्यात साजूक तूप टाकून लावा आणि एक मूठ नागकेशर वाहा. महादेव हा संसाराचा देव आहे, त्याच्या कृपेने संसारातले अडथळे दूर होतात.

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?

दुसऱ्या बाईच्या नादी लागला

५. श्रीकृष्णाचा जप कराजर नवरा वाईट संगतीला लागला असेल, व्यसन करत असेल किंवा दुसऱ्या बाईच्या नादी लागला असेल तर अशा वेळी बाईने श्रीकृष्णाची भक्ती करावी. कृष्ण हा स्त्रियांचा रक्षक आहे. रोज रात्री ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा १०८ वेळा जप करा. वेळ असेल तर विष्णु सहस्रनाम पण वाचा. याने मनाला खूप आधार मिळतो आणि बिघडलेली परिस्थिती हळूहळू सुधारते.शेवटी एकच लक्षात ठेवा, फक्त पूजा करून काही होत नाही.

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान! या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी

नवरा बायकोत एकमेकांबद्दल आदर हवा, एकमेकांशी मनमोकळं बोलणं हवं. राधा आणि कृष्णाचं प्रेम जसं निस्वार्थ होतं तसं आपल्या नात्यात पण समजूतदारपणा आणा. उपायांसोबतच प्रयत्न पण केले तर मोडकळीस आलेला संसार पुन्हा नक्की फुलेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astrological remedies to bring love and harmony in married life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Religion
  • religion news
  • religions

संबंधित बातम्या

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ
1

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ

Chandrapur News: दीक्षाभूमीच्या विकासावर संभ्रमाचे सावट; वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाची अध्यक्षांशी भेट
2

Chandrapur News: दीक्षाभूमीच्या विकासावर संभ्रमाचे सावट; वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाची अध्यक्षांशी भेट

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?
3

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?

Raigad News: तळा नगरपंचायतीत सत्ताधारी आघाडीत धुसफूस! विकासकामांना हिरवा कंदील, ठरावाला मात्र लाल सिग्नल
4

Raigad News: तळा नगरपंचायतीत सत्ताधारी आघाडीत धुसफूस! विकासकामांना हिरवा कंदील, ठरावाला मात्र लाल सिग्नल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.