फोटो सौजन्य- pinterest
वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये राहू ग्रहाला छाया ग्रह मानले जाते. राहू ग्रहाचा स्वभाव हा खूप रहस्यमय आणि अनिश्चित मानला जातो त्यामुळे त्याचे शुभ अशुभ परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होताना दिसून येतात. ज्यावेळी व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहूची स्थिती चांगली नसते त्यावेळी व्यक्तीला मानसिक ताण, राग, भीती, आर्थिक संकट आणि जीवनात अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो. यामुळे काही व्यक्तींना नेहमी वाईट सवयी, चुकीची संगत आणि गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होते. राहू हा कोणत्याही राशीचा स्वामी नाही. मात्र तो ज्या घरामध्ये किंवा राशीमध्ये स्थिर असतो त्या घरामध्ये त्याचा प्रभाव शुभ किंवा अशुभ पडतो. जाणून घ्या राहूचे उपाय
ज्योतिषशास्त्रात राहूचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय करणे खूप फायदेशीर ठरते. हे उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील राहूची स्थिती सुधारण्यास मदत होते.
राहू दोष कमी करण्यासाठी वैवाहिक जीवनात आणि सासरच्या लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध राखले पाहिजेत.
दररोज किंवा खास दिवशी कपाळावर केशरचा टिळक लावल्याने राहू ग्रह शांत होतो.
राहू ग्रहाला शांत करण्यासाठी गुरुवारी गरजूंना पिवळे कपडे, हरभरा डाळ, हळद किंवा अन्न दान करणे फायदेशीर ठरते.
वाईट सवयी आणि नकारात्मकता राहूचे दुष्परिणाम वाढवते, त्यामुळे त्यापासून दूर राहाणे खूप महत्त्वाचे मानले जाते.
घरातील शौचालय आणि पायऱ्या वास्तुच्या नियमांनुसार बांधल्या गेल्यास राहूशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.
राहूच्या दुष्परिणामांपासून सुटका मिळविण्यासाठी आवरुन झाल्यानंतर दररोज 108 वेळा ओम भ्रम भ्रम भ्रौण सह राहवे नम: या मंत्रांचा जप करणे खूप फायदेशीर मानले जाते. या मंत्रांचा नियमित जप केल्याने तुमच्या कुंडलीमधील राहू दोषाचा प्रभाव हळूहळू कमी होण्यास मदत होते.
शनिवारी किंवा राहुकाळा दरम्यान राहूच्या शांतीसाठी पूजा केल्यास शुभ फळ मिळते.
कालभैरव, भगवान शिव आणि माता दुर्गेची पूजा केल्याने राहू दोषही दूर होतो.
गोमेद रत्न
राहू दोष कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी गोमेद रत्न तुम्ही चांदीच्या अंगठीत घालून ते शनिवारी परिधान करु शकता. मात्र हे करताना ज्योतिषाचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)