पत्रिकेतील शुक्र बळकट करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय
ज्योतिषशास्त्रानुसार, अवकाशातील प्रत्येक ग्रहांचा मानवी जीवनावर चांगला वाईट परिणाम होत असतो. प्रत्येक ग्रह हा मानवी भावनांचं प्रतिनिधीत्व करत असतो. एखादा ग्रह पत्रिकेत कोणत्या स्थानी आहे, त्यावरुन त्या व्यक्तीच्या वर्तमान आणि भविष्यकाळाचा अंदाज बांधता येतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं. चला तर मग जाणून घेऊयात पत्रिकेतील शुक्र ग्रहाचं महत्व काय ? तो बलवान करण्यासाठी काय करावं ?
हेही वाचा- नवमी आणि दसऱ्याच्या दिवशी या गोष्टींची खरेदी करणे शुभ, जाणून घ्या खरेदीसाठी शुभ मुहूर्त
ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक व्यतीच्या पत्रिकेत काही ग्रह हे उच्च आणि निच स्थानावर असतात. त्याचा चांगला वाईट परिणाम मानवी जीवनावर होत असतो.
शुक्र ग्रह हा कलेचा कारक मानला जातो. असं म्हटलं जातं की, तूळ आणि वृषभ राशीच्या व्यक्तींचा स्वामी हा शुक्र ग्रह आहे. ज्या व्यक्तींचा शुक्र बलवान असतो, अशी माणसं रसिक असतात. त्यांना कलासक्त आयुष्य जगायला आवडतं. ही मोहक दिसतात. त्यांच्या हास्याने इतरांना भुरळ पडते. शुक्र बलवान असलेल्या व्यक्तींना प्रेम व्यक्त करणं चांगलं जमतं. माणसांना भौतिक सुखाची कमतरता जाणवत नाही. यांना वैवाहिक आयुष्यात सुख समाधान प्राप्त होतं. दिसायला सावळट असली तरी त्यांच्या मधूर वाणीने हे सगळ्यांची मनं जिंकतात.
शुक्र कमजोर असल्यास काय परिणाम होतात?
शुक्र ग्रह हा कला, सुख संपत्ती आणि प्रेमाचा कारक आहे. काहींच्या पत्रिकेत शुक्र कमजोर असल्यास अनेक अशुभ फलितं प्राप्त होतात. वैवाहिक आयुष्यात तााण तणाव असणं, जोडीदाराशी सतत वितंड वाद होणं हे पत्रिकेतील शुक्र कमजोर असण्याची लक्षणं आहेत. त्याचबरोबर आर्थिक समस्येला देखील सामोर जावे लागते.
हेही वाचा- दसऱ्याच्या दिवशी करा हे उपाय, आर्थिक संकट होईल दूर
शुक्र बलवान करण्याचे उपाय