(फोटो सौजन्य: Pinterest)
आज शनिवार, 6 सप्टेंबरचा दिवस. आज अनंत चतुर्दशी आहे. आज चंद्र शनिच्या कुंभ राशीमध्ये संक्रमण करणार आहे. चंद्राच्या या संक्रमणामुळे सूर्य, चंद्र आणि बुध समसप्तक योग तयार होईल. चंद्राची मंगळावर दृष्टी राहील आणि चंद्रामुळे वसुमन योग देखील तयार होईल. तर धनिष्ठा नक्षत्रामध्ये शुभ योग तयार होईल. या राशींच्या लोकांसाठी खूप फायदा होणार आहे. या राशींच्या लोकांना कोणकोणत्या गोष्टीमध्ये फायदा होणार आहे, जाणून घ्या.
Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीला धनिष्ठा-शताभिषा नक्षत्रासह सुकर्मा रवि योग, अशी करा अनंताची पूजा
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस खूप फायदेशीर राहणार आहे. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला तुमचे वडील आणि काकांना फायदा होऊ शकतो. या काळात तुम्ही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकतात. परदेशातील संबंधित कामात तुम्हाला फायदा होऊ शकतो. कोणत्याही अनुभवी आणि वरिष्ठ लोकांचा तुम्हाला सल्ला फायदेशीर राहील.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला अशा व्यक्तींकडून फायदा होऊ शकतो ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नव्हती. सामाजिक संपर्काचा तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे तुमच्यावरील प्रभाव देखील वाढेल. जोडीदारासोबत तुमचा दिवस चांगला राहील. तुम्ही समजूतदारीने कोणतेही काम करणार असाल तर आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. शिक्षण आणि स्पर्धेत तुमची कामगिरी चांगली होईल.
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. यांना आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो. व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. एखादा जुना मित्र तुम्हाला भेटायला येऊ शकतो. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जर तुम्ही नवीन कामाची सुरुवात करत असाल तर त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आज अपेक्षित सुख सुविधा मिळतील. तुम्हाला आज सरप्राइज मिळू शकते. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. पैसे कमावण्यासाठी इतर मार्ग शोधू शकता त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही वाहन देखील खरेदी करू शकता.
Numerology: या मूलांकांच्या लोकांची व्यवसायात होईल प्रगती, मिळेल अपेक्षित यश
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला आज समजात सन्मान मिळेल. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात वाढ होईल. तसेच तुम्हाला व्यवसायामध्ये आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही वाहन खरेदी करू शकता. तुम्ही राजकारण आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित असल्यास तुम्हाला लाभ होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या आईकडूनही फायदा होईल. सासरच्या लोकांकडूनही फायदा होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)