फोटो सौजन्य- chatgpt
गुजरातमधील जुनागडजवळील गिरनार पर्वत हे धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. हिंदू, जैन आणि नाथसंप्रदायासाठी पवित्र असलेल्या या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर गोरखनाथ शिखर म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी असलेले गोरखनाथ मंदिर योगी गुरू गोरखनाथ यांच्या तपश्चर्येशी जोडलेले आहे. हजारो पायऱ्यांचा कठीण प्रवास करून भाविक येथे पोहोचतात आणि दर्शनासोबतच आध्यात्मिक अनुभव घेतात.
गोरखनाथ मंदिर हे गुजरातमधील जुनागड शहराजवळ बसलेलं नाथसंप्रदायातील अत्यंत पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे. गोरखनाथ शिखर हे गिरनार पर्वतरांगेतील सर्वांत उंच शिखर मानलं जातं. येथे असलेलं गोरखनाथ मंदिर योगी गुरू गोरखनाथ यांच्या तपश्चर्येशी संबंधित असण्याची श्रद्धा आहे. योगी गुरू गोरखनाथ हे नाथसंप्रदायातील सर्वांत प्रभावशाली योगी मानले जातात. त्यांनी नाथयोगाचा प्रसार केला आणि भारतभर अनेक ठिकाणी प्रसार केले.
गिरनार हे त्यांच्या प्रमुख तपोभुमीपैकी एक मानले जातं. ऐतिहासिक नोंदीनुसार गिरनार पर्वत हिंदू, जैन आणि नाथसंप्रदायासाठी पवित्र मानला जातो. गोरखनाथ मंदिर नेमकं कधी बांधलं गेलं याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. मात्र अनेक शतकांपासून येथे अनेक साधु संतांचा तपश्चर्या सुरू असल्याचा उल्लेख मात्र नक्की आढळतो. गोरनार शिखर हे गिरनारमधील सर्वोच्च शिखर आहे. नाथसंप्रदायातील साधुसाठी अत्यंत पवित्र असं साधना स्थळ आहे. येथे ध्यान, योगसाधना आणि तपश्चर्येसाठी अनेक साधक येतात.
महाशिवरात्री आणि गिरनार यात्रेदरम्यान हजारो भाविक येते दर्शनासाठी येतात. गिरनार पर्वतावर जाण्यासाठी सुमारे दहा हजारांहून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात. या मार्गात अंबाजी मंदिर, जैन मंदिर आणि इतर धार्मिक मंदिराचं दर्शन घेत भाविक शेवटी गोरखनाथ शिखरावर पोहोचतात. आख्यायिकेनुसार, गुरू गोरखनाथ यांनी गिरनार पर्वतावरती दीर्घ काळ असं कठोर तप केलं त्यांच्या तपशक्तीमुळे हे स्थळ सिद्धपीठ बनलं आणि आजही येथे साधना केल्यास मनशांती आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते, असा भाविकांचा विश्वास आहे.
गिरनारवरील गोरखनाथ मंदिर योग, तपश्चर्या आणि नाथपरंपरेचं प्रतीक मानलं जातं. मात्र हजारो पायऱ्याचा प्रवास करून या शिखरावरती पोहोचणं अनेक भाविकांसाठी आध्यात्मिक साधनेचा एक महत्त्वाचा अनुभव मानला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: गोरखनाथ मंदिर गुजरातमधील जुनागडजवळील गिरनार पर्वतावर आहे.
Ans: हे मंदिर नाथसंप्रदायातील अत्यंत पवित्र साधनास्थळ मानले जाते. गुरू गोरखनाथ यांच्या तपश्चर्येशी हे स्थान जोडलेले आहे.
Ans: गोरखनाथ शिखर हे गिरनार पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर मानले जाते.






