बऱ्याचदा स्वयंपाक घरातील रोजच्या वापरातील काही वस्तू या हळूहळू संपत येतात पण कामाच्या गडबडीत आधीच भरुन ठेवण्याचं लक्षात राहत नाही. पण या चुका वास्तुदोषाचं कारण ठरतात. कोणत्या आहेत त्या जाणून घेऊयात.
घरातलं सामान जसं की मीठ, हळद आणि तांदूळ हे पूर्ण संपायच्या आत सामान भरणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरात मीठ, हळद आणि तांदूळ हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं.
हळदीचं महत्व
वास्तुशास्त्रात हळदीचं महत्व मोठं आहे. हळद शुभ मानली जात असून घरात साकात्मक ऊर्जा वाढीस लागायला हळद महत्वाची आहे. त्यामुळे हळदीची बरणी कायम भरलेली असावी रिकामी असू नये असं शास्त्र सांगतं.
मीठाचा डब्बा पूर्पपणे रिकामी होण्याची वाट कधीच पाहू नये. असं म्हटलं जातं, की घरातील सकारात्मक शक्ती संतुलित ठेवण्याची मीठ महत्वाचं आहे. मीठाची बरणी रिकामी होणं म्हणजे घरातील भांडणांना आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे मीठाची बरणी कायम भरलेली ठेवावी.
तांदूळ
हिंदू धर्मातील प्रत्येत शुभकार्य हे तांदळाशिवाय अपूर्ण आहे. तांदुळ शुभ आणि पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं. . किचनमधील तांदळाचा साठा संपल्यास घरातील आर्थिक बाजू सांभाळणं तारेवरची कसरत होते, असं म्हटलं जातं. त्यामुळे तांदूळ नेहमी थोड्याफार प्रमाणात उपलब्ध ठेवायलाच पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं.
त्यामुळे तांदूळ नेहमी थोड्याफार प्रमाणात उपलब्ध ठेवणे हिताचे मानले जाते.
स्वत्छता राखणं
घर आणि स्वयंपाकाची जागा छोटी असो किंवा मोठी ती स्वच्छ ठेवणं महत्वाचं आहे. याचा तुमच्या वास्तुवर मोठा परिणाम होत असतो. कधीही घरात स्वच्छता ठेवण्यात आळशीपणा करु नये. स्वच्छ घरात सकारात्मक शक्ती वास करते. त्यामुळे रोजच्या रोज घर स्वच्छ करायलाच पाहिजे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






