Maharashtra Breaking News Updates Today:
Maharashtra to World Breaking News – ऐन मे महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज; येत्या 14 ते 20 मे दरम्यान राज्यात
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात पुढील आठवड्यात, 14 ते 20 मे दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात मान्सूनसारखा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने कोकण भागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.






