पनवेलमध्ये सुमारे २०० वर्षे जुन्या यहुदी कब्रस्तानाच्या जागेवरील अतिक्रमणावर प्रशासनाने बुलडोझर चालवत मोठी कारवाई केली आहे. स्थानिक बिल्डरच्या मदतीने कब्रस्तानाच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या कारवाईनंतर नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी अशा अतिक्रमणांवर कठोर कारवाईची मागणीही जोर धरत आहे.