 
        
        फोटो सौजन्य - Social Media
महाभारत पृथ्वीच्या इतिहासातील एक महाभयंकर लढाई आहे. यात संपूर्ण कौरवसेना कुरुक्षेत्राच्या जमिनीत पुरली गेली. महाभारतातील एक एक कथा रंजक आहे. त्यातील एक महत्वाची कथा म्हणजे बर्बरीकाची! बर्बरिक म्हणजेच राजस्थनचा खाटू श्याम! बर्बरिक हा भीमाचा नातू आणि घटोत्कचाचा मुलगा! तसाच तो मुरी असुराच्या लेकीचा पुत्र! कुरळे केस आणि दिसायला अगदी बलवान हा असुरपुत्र, पांडव कुळातीलच!
कुरुक्षेत्राच्या लढाईत त्याला श्री कृष्णाने विचारण्यात आलेल्या प्रश्नाने त्याचा जीव घेतला. इतकेच नव्हे तर जीव घेणारा स्वतः विधाता होता. होय! श्री कृष्णाने बर्बरीकाचा वध केला. यामागे कारण असे की बर्बरिकाला विचारले गेले असता की तो कुणाच्या पक्षाने कुरुक्षेत्रावर लढेल? तेव्हा त्याचे उत्तर जिथे सैन्य दुर्बल तिथे मी!’ असे होते. त्यात बर्बरिककडे एक महाभंय असे अस्त्र होते. ज्याच्या एकाच वापराने संपूर्ण सैन्य उध्वस्त होऊन जाईल, यानंतर श्री कृष्णाने बर्बरीकाचा वध केला.
बर्बरिकच्या गोष्टीमागे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने एकदा तर त्याच्या पितामहांवर हात उचलला होता. भीम वनवासात असताना पाय स्वच्छ न करता तळ्यात उतरला होता. धर्मराज युद्धिष्ठिराने त्याला तसे न करण्यास सांगितले पण भीम ऐकला नाही आणि तळ्यात उतरला. तेव्हा त्या तळ्याचे पाणी दूषित झाले. त्यामुळे तिथे असणाऱ्या बर्बरिकला राग आला आणि त्याने भीमावर हात उचलला. त्याला उचलून पाण्यात फेकणारच असता तेव्हा भगवान आदींनी त्याला दर्शन दिले आणि सांगितले की भीम तुझे पितामह आहेत. तेव्हा बर्बरिक शांत झाला आणि भीमाच्या पायी वंदन झाला. त्या क्षणी अनेक देवी देवता तेथे उपस्थित होते.
बर्बरिक इतका दुखी होतो की तो स्वतःला संपवयाला निघतो पण सगळ्यांच्या समजेने तो शांत होतो.






