मंगळ गोचराचा कोणत्या राशींवर पडणार प्रभाव
ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, यावेळी मंगळ स्वामी वक्री स्थितीत आहे आणि लवकरच मिथुन राशीत प्रवेश करेल. या वर्षी मंगळाचे हे पहिले मोठे संक्रमण असल्याचे म्हटले जात आहे. प्रतिगामी अवस्थेत मंगळाचा प्रभाव वेगळा असतो.
साधारणपणे, ग्रहांच्या वक्री गतीचा नकारात्मक परिणाम होतो, परंतु 21 जानेवारी रोजी मंगळाच्या राशीतील हा बदल तीन राशीच्या लोकांसाठी खूप खास मानला जातो. ज्योतिषी समीर मणेरीकर म्हणत आहेत की, मंगळाच्या या संक्रमणामुळे 3 राशीच्या लोकांचे भाग्य चमकणार आहे आणि या तीन राशी नक्की कोणत्या आहेत आणि त्यांना कशा पद्धतीचा फायदा मिळणार आहे आपण जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock/pinterest)
मंगळ कधी होणार मार्गी आणि वक्री
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रह 7 डिसेंबर 2024 रोजी वक्री झाला आणि 24 फेब्रुवारी 2025 रोजी तो मार्गी होणार आहे. याआधी, 21 जानेवारी 2025 रोजी मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल अर्थात मंगळ मिथुन राशीमध्ये गोचर होणार आहे आणि मिथुनचा स्वामी हा बुध ग्रह आहे. त्यामुळे बुध राशीमध्ये मंगळ मार्गी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही राशींसाठी हा बदल अत्यंत फायदेशीर ठरेल.
वृषभ राशीसाठी उत्तम
वृषभ राशीचे नशीब फळफळणार
मिथुन राशीतील मंगळाचे वक्र भ्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांच्या धन घरात मंगळ ग्रहाचे भ्रमण होईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. अनेक स्रोतांकडून पैसा येईल, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर आणि समृद्ध होईल.
तूळ राशीसाठीदेखील ठरेल उत्तम
तूळ राशीवरही मंगळ गोचराचा राहणार प्रभाव
तूळ राशीसाठी मंगळाचे भ्रमण नवव्या घरात असेल, जे भाग्याचे घर आहे. अशा परिस्थितीत, या काळात नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल, ज्यामुळे प्रलंबित कामे देखील पूर्ण होतील. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येतील. कठीण परिस्थितींना तोंड देण्यासाठी तुम्हाला बळ आणि धैर्य मिळेल. रागावर नियंत्रण राहील.
कुंभ राशीला मिळेल लाभ
कुंभ राशीला काय होणार फायदा
कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे भ्रमण खूप शुभ राहील. प्रेम जीवनातील सर्व समस्या संपतील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. जोडीदारासोबतचे संबंध गोड आणि समजूतदार असतील. आरोग्य चांगले राहील आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. नशीब तुमच्या बाजूने असल्याने, जीवनाच्या इतर क्षेत्रातही सकारात्मक बदल दिसून येतील. व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे काम पूर्ण होईल.
मंगळाचे उपाय काय कराल?
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.