हिंदू धर्मशास्त्रानुसार, महादेवांना आराध्य दैवत मानलं जातं. त्यामुळे अनेक शिवभक्त मासिक शिवरात्रीला देखील उपासना करतात. पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील चैत्र कृष्ण पक्ष म्हणजे 17 मार्च रोजी ही शिवरात्री आहे. 17 मार्चला सकाळी 9.23 ला सुरु होऊन 18 मार्च सकाळी 8.25 पर्यंत असणार आहे. या शिवरात्रीच्य़ा पुजेचा मुहुर्त देखील सांगितला आहे. शिवरात्रीची पूजा ही निशिता काळ म्हणजेच 12 ते 1 या वेळेत होणार आहे. याचबरोबर पूजाविधी झाल्यानंतर पारायण देखील केलं जातं.
तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने देखील शिवरात्रीची पूजा करु शकता. त्याचबरोबर या पूजेसाठी बेलाची पानं, दुर्वा, शमीची पानं, धतुऱ्याचं किंवा गोकर्णची फुलं त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची फुलं तुम्ही पुजेसाठी वापरु शकता. पुजेसाठी गंगाजल देखील महत्वाचं आहे. महादेवांच्या पूजेदरम्यान दुधाचा अभिषेक केल्याने फलदायी ठरतं. त्याशिवाय धोतऱ्या फळ पूजेला ठेवल्याने महादेवांचा कृपाशिर्वाद मिळतो.
शिवरात्रीला करा ‘या’ मंत्रांचा जप
महामृत्युंजय मंत्र
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
शिव स्तुति मंत्र
दः स्वप्नदुः शकुन दुर्गतिदौर्मनस्य, दुर्भिक्षदुर्व्यसन दुस्सहदुर्यशांसि । उत्पाततापविषभीतिमसद्रहार्ति, व्याधीश्चनाशयतुमे जगतातमीशः ।।
शिव नामावली मंत्र
।। श्री शिवाय नमः ।।
।। श्री शंकराय नमः ।।
।। श्री महेश्वराय नमः ।।
।। श्री सांबसदाशिवाय नमः ।।
।। श्री रुद्राय नमः ।।
।। ओम पार्वतीपतये नमः ।।
।। ओम नमो नीलकण्ठाय नमः ।।
शिव प्रार्थना मंत्र
करचरणकृतं वाक् कायजं कर्मजं श्रावण वाणंजं वा मानसंवापराधं । विहितं विहितं वा सर्व मेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शम्भो ॥
शिव गायत्री मंत्र
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि, तन्नो रुद्रः प्रचोदयात् ।
शिव आरोग्य मंत्र
माम् भयात् सवतो रक्ष श्रियम् सर्वदा । आरोग्य देही में देव देव, देव नमोस्तुते ।। ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
पूजा विधीबरोबरच या मंत्रांचा जप केल्याने महादेवांचा कृपाशिर्वाद मिळतो.






