फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसून येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थितीनुसार अनेक योग आणि राजयोग तयार होत असतात ज्याचा काही राशीच्या लोकांना विशेष फायदा होतो. यावेळी दिवाळीपूर्वी म्हणजेच मंगळवार, 14 ऑक्टोबर रोजी हा शक्तिशाली राजयोग तयार होणार आहे, ज्याचा फायदा अनेक राशीच्या लोकांना होणार आहे. हा योग 84 वर्षांनंतर तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार, 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.34 वाजता शुक्र आणि युरेनस एकमेकांपासून 120 अंशांवर असतील, ज्यामुळे नवपंचम योग तयार होणार आहे.
नवपंचम राजयोग 84 वर्षांनंतर तयार होत आहे. या राजयोगादरम्यान युरेनस वृषभ राशीत असेल आणि शुक्र कन्या राशीत असेल. या ग्रहांचे स्थान आणि नवपंचम राजयोगाची निर्मिती काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. तसेच या काळात तुम्हाला अमाप संपत्ती मिळू शकते. नवपंचम योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला राहील. या काळात भौतिक सुखसोयी मिळतील आणि ते वाहने किंवा मालमत्ता खरेदी करू शकतील. कौटुंबिक जीवनामध्ये असलेले वाद मिटू शकतात. या काळात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. सामाजिक क्षेत्रामध्ये असणाऱ्यांना मान सन्मान मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते आणि नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती होऊ शकते. व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो आणि आर्थिक स्थिती सुधारु शकते. या राजयोगामुळे तुमचा दिवस चांगला राहील. व्यवसायात लाभ होऊ शकतो. तुमच्या बोलण्यावर प्रभाव पडेल. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप शुभ असणार आहे. या योगामध्ये तुमचे नशीब बदलेल. नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो. जर तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला राहील. तुमची वैयक्तिक जीवनात प्रगती होईल. जे लोक नवीन व्यवसाय सुरु करणार आहेत त्यांच्यासाठी हा काळ उत्तम राहणार आहे. कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्या लोकांना नेतृत्वाच्या नवीन संधी मिळू शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)